Honda H’ness CB350 कडून विक्रीचे रेकॉर्ड मोडीत, तीन महिन्यात हजारो युनिट्सची विक्री

Honda H’ness CB350 या बाईकने 10,000 यूनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. ही बाईक कपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच केली होती.

Honda H’ness CB350 कडून विक्रीचे रेकॉर्ड मोडीत, तीन महिन्यात हजारो युनिट्सची विक्री
Honda-H’ness-CB350
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:42 PM

मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) बुधवारी घोषणा केली आहे की, कंपनीने नुकतीच लाँच केलेली Honda H’ness CB350 ने 10,000 यूनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. ही बाईक कपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच केली होती. ही बाईक 350-500cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये जबरदस्त पर्याय आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, जावा क्लासिक आणि Benelli Imperiale 400 सारख्या बाईक्सना जोरदार टक्कर देत आहे. (Honda H’ness CB350 hits 10,000 sales mark in three months, know more about this bike)

या दुचाकीच्या विक्रीबद्दल बोलताना होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे संचालक (सेल्स मार्केटिंग) यदविंदर सिंह गुलेरिया यांनी सांगितले की, “होंडा हायनेस सीबी 350 ने आधुनिक-क्लासिक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये, रिफाइन्मेंट आणि बिल्ट क्वालिटीसाठी ग्राहकांकडून भरभरुन प्रशंसा मिळविली आहे. लोकांना ही बाईक खूप आवडली आहे. त्यामुळेच आम्ही अल्पावधित 10,000 युनिट्स विकण्याचा रेकॉर्ड केला आहे. आम्ही सध्या बुक करण्यात आलेल्या बाईक लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. होंडा हायनेस CB350 चा वेटिंग टाईम कमी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचं BigWing नेटवर्कचा इतर शहरांमध्येही विस्तार करीत आहेत.

जबरदस्त इंजिन

या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. तर या बाईकच्या DLX Pro व्हेरिएंटची किंमत 1.90 लाख रुपये आहे. हायनेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टॅन्क आहे.

सीबी ब्रॅण्डचा मोठा इतिहास

होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा (सिरीजचा) एक मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी 92 ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी 350 ही बाईक हा इतिहास पुढे नेत आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

(Honda H’ness CB350 hits 10,000 sales mark in three months, know more about this bike)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.