26KM मायलेज, Honda हायब्रिड SUV HR-V लाँचिंगसाठी सज्ज
जपानी कार निर्माता कंपनी होंडा (Honda) लवकरच त्यांची हायब्रिड एसयूव्ही होंडा एचआर-व्ही (Honda HR-V) भारतात लाँच करू शकते.

मुंबई : जपानी कार निर्माता कंपनी होंडा (Honda) लवकरच त्यांची हायब्रिड एसयूव्ही होंडा एचआर-व्ही (Honda HR-V) भारतात लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार कंपनी दिवाळीपर्यंत ही एसयूव्ही लाँच करू शकते. तथापि, कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Honda HR-V Hybrid SUV is going to launch in India soon)
होंडाने अलीकडे थायलंडमधील बाजारात एचआर-व्ही एसयूव्हीचे (HR-V SUV) थर्ड जनरेशन मॉडेल सादर केले आहे. असं म्हटलं जात आहे की कंपनी काही अपडेट्ससह ही कार भारतात लाँच करु शकते. तसेच या कारला अधिक प्रीमियम इंटिरियर आणि मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात येईल. ही नवीन एसयूव्ही अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 26 किलोमीटरचं मायलेज देईल.
Honda HR-V Hybrid चं इंजिन आणि फीचर्स
Honda HR-V Hybrid मध्ये कंपनीने 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह दोन लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. या कारचं इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रितपणे 109 पीएस पॉवर जनरेट करतात. हे इंटिग्रेटेड इंजिन मल्टीमोड ड्राइव्ह (iMMD) तंत्रज्ञानाने सज्ज आहे. हायब्रिड व्हर्जनव्यतिरिक्त ही कार नॅचरल एस्पिरेटेड इंडनसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 1.5-लीटर क्षमतेचे नैसर्गिक इंजिन आहे जे 121bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करतं.
या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास या एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये काही बदल केले जातील. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, होंडा कनेक्ट डिस्प्ले, पॅनारोमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक एसी आणि लार्ज टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह फ्री पॉवर टेलगेट असेल. याशिवाय अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), रियर पार्किंग सेन्सर आणि रियर पार्किंग कॅमेरा असे फीचर्स या एसयूव्हीमध्ये उपलब्ध असतील.
कशी असेल Honda HR-V Hybrid
या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, ही नवीन एसयूव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा सुमारे 120 mm लांब आणि 10 mm रुंद असेल. तथापि, या कारची उंची 5 mm कमी असेल आणि व्हीलबेस 20 mm अधिक असेल. या कारच्या नवीन मॉडेलची लांबी 4450 mm, रुंदी 1780 mm, उंची 1600 mm आणि व्हीलबेस 2630 mm असेल.
इतर बातम्या
7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift बाजारात, ‘या’ फीचर्समुळे कारची लोकप्रियता आणखी वाढेल
भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट
(Honda HR-V Hybrid SUV is going to launch in India soon)