Honda: ॲडव्हेंचरस बाईकच्या चाहत्यांसाठी खुशखबर! होंडाचे तीन नवे मॉडेल होणार लाँच

125cc स्कूटर व्यतिरिक्त Honda 160cc आणि 300-350cc बाईक लाँच होण्याचा अंदाज आहे. BS6-2 OBD नियम लागू होण्यापूर्वीच कंपनी तिन्ही आगामी मॉडेल लाँच करू शकते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील.

Honda: ॲडव्हेंचरस बाईकच्या चाहत्यांसाठी खुशखबर! होंडाचे तीन नवे मॉडेल होणार लाँच
honda bikeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:13 PM

जपानी टू-व्हीलर कंपनी होंडा (Honda) भारतात तीन नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारात एक स्कूटर (Scooter) आणि दोन मोटरसायकल लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, होंडा 125 सीसी (Honda 125cc) पॉवर स्कूटर आणि 160cc स्पोर्टियर बाईक देखील येईल. कंपनी 300-350cc टूरर बाइक देखील लाँच करू शकते. संपूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्री सेमीकंडक्टरच्या कमतरतेने त्रस्त आहे. मात्र भारतात दुचाकींची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, होंडाच्या तीनही अपकमिंग दुचाकी मॉडेल्स ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

स्पेशल एडिशन लाँच

होंडा स्कूटर भारतात खूप लोकप्रिय आहेत. होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला देशातील स्कूटरप्रेमींमध्ये मोठी मागणी आहे. होंडाने देखील अलीकडे अ‍ॅक्टिव्हाचे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. ऑटो वेबसाइट Zigwheels नुसार, होंडा Motorcycle & Scooter India चे अध्यक्ष MD आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी अलीकडेच घोषणा केली, की कंपनी तीन नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे. यात 125cc स्कूटरचाही समावेश आहे.

होंडाची नवीन 160cc बाईक

होंडाची अपकमिंग 160cc बाईक ही प्रीमियम आणि स्पोर्टियर मोटरसायकल असेल. आगामी बाईक बजाज N160 आणि TVS Apache RTR 160 4V सारख्या बाईकला टक्कर देईल. दरम्यान, होंडाची एक्स-ब्लेड बाईक पल्सर आणि अपाचेशी स्पर्धा देखील करेल. होंडाची आगामी 160cc बाईक अधिक स्पोर्टी असेल

हे सुद्धा वाचा

ॲडव्हेंचर बाईक

होंडा 300-350cc मोटरसायकल ही ॲडव्हेंच टूरर बाइक असू शकते. आगामी बाईक नुकत्याच लाँच झालेल्या Honda CB300F बाईकवर आधारित असू शकता. आगामी बाइकला उत्तम हायवे राइडिंग अनुभवासाठी दमदार इंजिन मिळेल. ॲडव्हेंचप्रेमींसाठी ही बाईक उत्तम पर्याय ठरू शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.