तुमची बाईक नेमका किती मायलेज देते? असे करा माहिती
अनेकदा, जेव्हा लोकं बाइक किंवा इतर कोणतेही वाहन खरेदी करतात तेव्हा ते कंपनीने नमूद केलेल्या मायलेजवर अवलंबून असतात. बर्याचदा बाईक 90 किंवा 100 kmpl चा मायलेज देत असल्याचा दावा केला जातो.
मुंबई : गाव असो वा शहर, श्रीमंत असो की गरीब, लोकं गर्दीच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सहसा दुचाकी वाहनांचा वापर करतात. त्यांचा एक फायदा म्हणजे यामध्ये तुम्हाला कारच्या तुलनेत चांगले मायलेज (Bike Mileage Formula) मिळते. म्हणजे तुमचा खर्च कमी होतो. पण तुमची बाईक किती मायलेज देतेय हे जाणून घेणंही खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा अचूक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्कूटरचे मायलेज जाणून घेऊ शकता.
कंपन्यांवर अवलंबून राहू नका
अनेकदा, जेव्हा लोकं बाइक किंवा इतर कोणतेही वाहन खरेदी करतात तेव्हा ते कंपनीने नमूद केलेल्या मायलेजवर अवलंबून असतात. बर्याचदा बाईक 90 किंवा 100 kmpl चा मायलेज देत असल्याचा दावा केला जातो. पण ते मायलेज मशीन टेस्टेड आहे. वास्तविक परिस्थितीत तुमचे वाहन त्यापेक्षा कमी मायलेज देईल.
याप्रमाणे तुमच्या बाइकचे योग्य मायलेज जाणून घ्या
1: सर्वप्रथम पेट्रोल पंपावर जा आणि तुमची बाईकची पेट्रोल टाकी भरून घ्या.
2: पेट्रोल पंप सोडण्यापूर्वी, ट्रिप मीटर 0 वर सेट करा.
3: बाइक सुमारे 100kms चालवा.
4: आता पुन्हा पेट्रोल पंपावर जा आणि टाकी भरून घ्या. यावेळी किती लिटर पेट्रोल आले ते लक्षात घ्या.
5: आता 100kms ला लिटरच्या संख्येने भागून मायलेज मोजा.
उदाहरणार्थ, तुम्ही 100KM सायकल चालवली आणि त्यानंतर टाकीमध्ये 2.5 लिटर पेट्रोल आहे. आता 100/2.5 म्हणजे बाईक 40kmpl मायलेज देत आहे.