सकाळी कारचे इंजिन थंड होते? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, वाढेल इंजिन लाईफ
Car Care Tips: सकाळी कारचे इंजिन खूप थंड असते, अशा वेळी तुम्ही सकाळी कार सुरु करताना काही चुकीच्या गोष्टी केल्यास कारचे इंजिन खराब होऊ शकते. अशावेळी इंजिन सुरू करताना काही टिप्स फॉलो करायला हव्यात. या टिप्सविषयी जाणून घ्या.
Car Care Tips : आम्ही आज तुम्हाला तुमच्या कारच्या इंजिन लाईफविषयी सांगणार आहोत. तुमच्या काही चुका कारचे इंजिन खराब करू शकतात. हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. पण, अशा काही चुका आहेत, ज्या टाळल्यास तुमच्या कारचे इंजिन लाईफ वाढेल. आम्ही खाली काही टिप्स देत आहोत, त्या फॉलो करा.
सकाळी गाडी स्टार्ट करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. खरं तर सकाळी गाडी स्टार्ट केली की त्याचं इंजिन खूप थंड झालेलं असतं, हे तर तुम्हाला माहितच असेल. अशावेळी इंजिन सुरू करताना काही टिप्स फॉलो करायला हव्यात. असे न केल्यास कारचे इंजिन खराब होऊ शकते. आम्ही खाली काही टिप्स देत आहोत, त्या फॉलो करा.
जास्त वेळ इंजिन चालू ठेवू नका
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारचे थंड इंजिन बराच वेळ चालू ठेवणे चांगले आहे, असे अनेकांना वाटते. कारण, आपण असं अनेकांकडून ऐकतो. पण 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ गाडी स्टार्ट ठेवणे आवश्यक नाही. यापेक्षा जास्त काळ गाडी सुरू ठेवल्यास इंधनाचा अनावश्यक खर्च होतो. हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
इंजिन हळूहळू गरम होऊ द्या
दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी स्टार्ट केल्यानंतर थोडा वेळ ड्रायव्हिंग करा आणि हळूहळू स्पीड वाढवा. इंजिन हळूहळू गरम होते, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारते. हे करताना कोणतीही घाई करू नका. कारण, छोटी चुकही तुमचे इंजिन खराब करू शकते.
एक्सीलरेटरचा अतिवापर करू नका
गाडी सुरु केल्यानंतर लगेच जास्त रेस देऊ नका. असे केल्याने इंजिनवर दबाव येतो आणि इंधन जास्त खर्च होते. त्यामुळे सावकाश गाडीची स्पीड वाढवा. एक्सीलरेटचा अतिवापर टाळा, हे याठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
वेळेवर सर्व्हिसिंग करा
यात तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि इतर भागांची नियमित तपासणी केल्यास इंजिनची कामगिरी चांगली होते. यामुळे थंड हवामानातही इंजिन लवकर गरम होते. त्यामुळे इंजिन थंड होण्याची समस्या असेल तर या गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.
बॅटरी आणि इतर यंत्रणा तपासा
चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड हवामानात बॅटरीची व्होल्टेज आणि कूलंट लेव्हल तपासणे गरजेचे आहे. बॅटरी कमकुवत असेल तर स्टार्टमध्ये अडचण येऊ शकते. यामुळे थंड हवामानात बॅटरी व्होल्टेज तपासा.
एकंदरीत सकाळी 30 सेकंद गाडी स्टार्ट करून ठेवणे त्याच्या इंजिनसाठी पुरेसे आहे. बराच वेळ सुरुवात केल्यास इंधनाचा खर्च वाढू शकतो आणि इंजिनवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या कारचे किंवा गाडीचे इंजिन लाईफ वाढेल आणि इंजिन खराब होणार नाही.