Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्युंडाई अल्काझारचे सीएनजी व्हेरिएंट भारतात लाँच होणार, चाचणीला सुरुवात  

ह्युंडाई आणि तिची सहयोगी कंपनी असलेली किया भारतात लवकरच सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची एक संपूर्ण सिरीजच लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ह्युंडाई अल्काझारचे एक टेस्टींग मॉडेल सीएनजी किटसोबत चाचणी करताना स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे याचे लवकरच भारतात लाँचिंग होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

ह्युंडाई अल्काझारचे सीएनजी व्हेरिएंट भारतात लाँच होणार, चाचणीला सुरुवात  
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:45 PM

भारतासह जगभरात इंधनाच्या किमतींमध्ये (Fuel prices) वेगाने वाढ होत आहे. इंधनाचे भाव रोजच वाढत असल्याने आता लोक इंधनाला पर्याय ठरु शकणाऱ्या वाहनांकडे वळले आहेत. ग्राहकांचा ओढा आता सीएनजी, इलेक्ट्रिक व इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांकडे वाढताना दिसून येत आहे. त्यातच सध्या सीएनजीचे मार्केट अधिक गरम असल्याने कंपन्या आपल्या विविध चारचाकी गाड्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये (CNG variant) आणत असल्याचे दिसून येत आहे. ह्युंडाईचा विचार करताना कंपनीने आधीच सँट्रो ग्रेंड, आय 10 निऑस आणि ऑरा या तीन सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. ह्युंडाई आणि तिची सहयोगी कंपनी किया भारतात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची एक सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच किया सोनेट आणि कॅरेन्स या कार्सना सीएनजी किटसह चाचणी करताना स्पॉट करण्यात आलेलं आहे. आता ह्युंडाई अल्काझारलाही (Hyundai Alcazar) सीएनजी किटमध्ये चाचणीसाठी पाहण्यात आले आहे. त्यामुळे तिही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ह्युंडाई अल्काझार भारतात दोन इंजीन पर्यायांसह उपलब्ध आहे. त्यात, एक 2.0 लीटर एनए पेट्रोल युनीट आणि दुसरी आहे 1.5 लीटर टर्बो डिझेल युनीट दोन्ही पॉवर प्लांट 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉक कन्हर्टर ऑटोमॅटीक ट्रांसमिशनच्या पर्यायांसह उपलब्ध आहेत. सीएनजी किटला निवडक टिम लेव्हलवर पेट्रोल इंजीनसोबत (मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत) जोडण्यात येणार आहे.

कियाची सीएनजी कार

कियाच्या सध्याच्या लाइनअपमध्ये कुठलेही सीएनजी मॉडल नसले तरी, कंपनीच्या पुढील काही व्हेरिएंट सीएनजी पॉवरट्रेन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजीनवर आधरीत असू शकता, अशी माहिती आहे. या व्यतिरिक्त ह्युंडाई वेन्यूला सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात 6 स्पीड मॅन्यूअल ट्रांसमिशन समाविष्ट केले जाणार आहे. परंतु याबाबत कंपनीकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

टाटा सफारी सोबत स्पर्धा

दरम्यान, ह्युंडाई अल्काझार क्रेटा यांचे तीन रो-व्हर्जन असून ते सहा आणि सात सीट कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार आहेत. सोबतच खुपसारे फिचर्स आणि इक्विपमेंटसोबत ते उपलब्ध होणार आहेत. याची किंमत 16.34 लाख रुपयांपासून सुरु होऊन ती 20.15 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या कार्सची स्पर्धा टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस आणि महिंद्रा एक्सयुव्ही 700 सोबत केली जात आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.