‘या’ आहेत Hyundai च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या तीन कार, तिसरीची किंमत तर सहा लाखांपेक्षाही कमी
भारतीय बाजारात ह्युंदाईने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ग्राहकाच्या सर्वाधिक पसंतीला पडलेल्या या तीन कारबद्दल जाणून घेऊया

मुंबई, बऱ्याच काळापासून, Hyundai ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी राहिली आहे. नोव्हेंबर महिन्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटर या गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कंपन्या ठरल्या आहेत. जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर, मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये 1.32 लाखांहून अधिक वाहनांची घाऊक विक्री केली, तर ह्युंदाईने या कालावधीत 48,002 वाहनांची विक्री केली. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 37,001 विकल्याच्या तुलनेत Hyundai ने 30 टक्के वाढ नोंदवली आहे. चला एक नजर टाकूया तीन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Hyundai कारवर.
Hyundai Creta
Hyundai Creta ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, क्रेटाच्या 13,321 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधील 10,300 युनिट्सच्या तुलनेत 29 टक्के वाढ आहे. क्रेटाची किंमत रु. 10.44 लाख पासून सुरू होते आणि रु. 18.24 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
2.Hyundai व्हेन्यू
ही कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, व्हेन्यूच्या 10,738 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 35 टक्के अधिक आहे. Hyundai च्या या सब-कॉम्पॅक्ट SUV ची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कर टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा आणि किया सोनेट यांच्याशी स्पर्धा करते.




3. Grand i10 Nios
Hyundai ची ही सर्वात स्वस्त कार आहे. त्याची किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते. गेल्या महिन्यात, Hyundai Grand i10 Nios 7,961 युनिट्सची विक्री झाली, जी नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 5,466 युनिट्सच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढली आहे. यात CNG किटचा पर्याय देखील आहे, ज्याच्या मदतीने कारचे मायलेज 28KM पर्यंत पोहोचते.