Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyundai सादर करणार ‘मेड फर्स्ट फॉर इंडिया’ SUV, जाणून घ्या 7 सीटर कारचे फीचर्स

HMIL कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या 7 सीटर प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे.

Hyundai सादर करणार 'मेड फर्स्ट फॉर इंडिया' SUV, जाणून घ्या 7 सीटर कारचे फीचर्स
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 3:18 PM

मुंबई : ह्युंदाय मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) बुधवारी सांगितले की, कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, ह्युंदाय अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल, असं कंपनीने म्हटलं आहे. (Hyundai to enter 7-seater premium SUV space in India with Alcazar launch)

HMIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस किम म्हणाले की, “2021 हे वर्ष एचएमआयएलच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय जोडेल, कारण आम्ही नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करून त्यास नव्याने डिफाईन करण्यास तयार आहोत. देशात ह्युंदायला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलताना किम म्हणाले की, “आम्ही ह्युंदाय Alcazar च्या जागतिक लाँचिंगसह भारतीय ग्राहकांप्रती आमच्या वचनबद्धतेवर जोर देऊ. Hyundai Alcazar सात सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करेल, या सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 500, नुकत्याच लाँच झालेली 2021 टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या एसयूव्हींना ह्युंदायची Alcazar टक्कर देईल.

HMIL ने म्हटले आहे की Alcazar लक्झरी डिझाईनकडून प्रेरित आहे, जे आकर्षक आणि प्रशस्त तसेच मजबुतीचं प्रतीक आहे. ही कार अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने त्यांच्या या आगामी उत्पादनाशी संबंधित अधिक माहिती दिलेली नाही.

ह्युंदाय कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाय आगामी काळात अनेक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पँसेंजर व्हीकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

(Hyundai to enter 7-seater premium SUV space in India with Alcazar launch)

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.