आनंद महिंद्रा यांनी दाखवली देशातील पहिल्या हवाई टॅक्सची झलक; फोटो शेअर करत दिली ही माहिती खास

Flying Electric Car : दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रांनी देशातील पहिली फ्लाईंग टॅक्सीची एक झलक दाखवली आहे. महिंद्रांनी या फ्लाईंग कारच्या फीचर्सची माहिती पण दिली आहे. काय आहे ही कार आणि तिचा काय उपयोग होणार, जाणून घ्या..

आनंद महिंद्रा यांनी दाखवली देशातील पहिल्या हवाई टॅक्सची झलक; फोटो शेअर करत दिली ही माहिती खास
देशीतील पहिल्या हवाई टॅक्सीची झलक
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 5:56 PM

महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाज माध्यमांवर त्यांचा भलामोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी याच माध्यमावर देशातील पहिल्या हवाई टॅक्सीची झलक दाखवली आहे. त्यांनी ही दळणवळणाच्या जगतातील क्रांती म्हटली आहे. आनंद महिंद्रा यांनी या फ्लाईंग कारच्या फीचर्स पण माहिती शेअर केली आहे. ही कार पुढील वर्षी देशात लाँच होऊ शकते,अशी शक्यता पण त्यांनी वर्तवली आहे.

200 किलो वजन वाहून नेणार

या फ्लाईंग कारचा फोटो आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. ही फ्लाईंग टॅक्सी एकावेळी 200 किलो वजन वाहून नेऊ शकते. तर ती 200 किलोमीटरचे अंतर कापू शकते. आनंद महिंद्रा यांनी या इलेक्ट्रिक फ्लाईंग कारचा फोटो पण शेअर केला आहे. जाणून घ्या त्यांनी काय अधिक माहिती शेअर केली ते…

हे सुद्धा वाचा

देशातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी

  1. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरुन या हवाई टॅक्सीचा फोटो शेअर केला आहे. IIT Madras यांनी देशाची पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी तयार करण्यासाठी ईप्लेन कंपनी स्थापन केली आहे. ही इलेक्ट्रिक फ्लाईंग कार पुढील वर्षांपर्यंत आकाशात भरारी घेण्याचा विश्वास त्यांना वाटत आहे.
  2. आयआयटी मद्रास हे जगातील रोमांचक आणि सक्रिय इनक्युबेटर असल्याची कौतुकाचा थाप त्यांनी दिली. तर देशात अशा संस्था उदयास येत असल्याने नवनवीन तंत्रज्ञान, अविष्कार येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आयआयटी मद्रासने तयार करण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीच्या फीचर्सची माहिती दिली.

जगातील नवीनता

  1. हवाई टॅक्सी हा जगातील नवीन शोध असल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले. त्यांनी देशातील पहिल्या हवाई टॅक्सीचा फोटो ट्वीट केला. तसेच या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मद्रासचे कौतुक केले. त्यांनी हे भविष्यातील वाहन असल्याचे सांगितले.पुढील वर्षात कदाचिती भारतात दळणवळणाचं नवीन साधन उपलब्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  2. ही हवाई टॅक्सी ईप्लेन कंपनी आयआयटी मद्राससह तयार करत आहे. ईप्लेन ही कंपनी चेन्नईतील स्टार्टअप आहे. या कंपनीला गेल्यावर्षी डायरेक्टर ऑफ सिव्हिल एविएशनने इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी मंजूरी दिली होती. ईप्लेन कंपनीने या एअर टॅक्सीला ई200 नाव दिले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही हवाई टॅक्सी 200 किलोमीटर हवाई अंतर कापेल.
Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....