New Car | टाटा आणि महिंद्राला आसमान दाखवायला मारुतीची मिड साईज एसयुव्ही सज्ज… कधी होणार दाखल?
New Car | देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया मिड साईज एसयुव्ही बाजारात आणणार असून या माध्यमातून मारुतीचा देशातील एकूण बाजारपेठेतील हिस्सा वाढणार आहे. मारुतीचा सध्या एकूण मार्केट शेअरर्स 45 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
New Car | देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) मिड साईज एसयुव्ही बाजारात आणणार असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून टाटा (Tata) आणि महिंद्राला (Mahindra) टक्कर देण्याचा मारुतीचा प्रयत्न आहे. मारुतीकडे सध्या मिड एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणतीही कार नाही. मारुतीचा सध्या एकूण मार्केट शेअरर्स 45 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
मार्केट शेअर वाढवणार
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, नॉन एसयुव्ही सेगमेंटमध्ये कंपनीचे मार्केट शेअरर्स 65 टक्क्यांहून अधिक आहे, तर एसयुव्ही सेगमेंटमधील हिस्सा फारसा नाही. कंपनीचे एकूण मार्केट शेअर्स 50 टक्क्यांपर्यंत नेणे हे कंपनीचे मूळ ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
एसयुव्ही सेगमेंटमध्ये होणार वाढ
श्रीवास्तव म्हणाले, की एसयुव्ही हा सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा सेगमेंट आहे. यामध्ये मारुतीचा चांगला मार्केट शेअर असावा, अशी कंपनीची अपेक्षा आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये दरवर्षी विकल्या जाणाऱ्या 6.6 लाख कारपैकी 20 टक्के हिस्सा मारुतीचा आहे. मारुतीकडे सध्या मिड एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणतीही कार नाही. या विभागातील वार्षिक विक्री 5.5 लाख युनिट्सची आहे.
मिड सेगमेंट एसयुव्हीमध्ये पिछाडीवर
श्रीवास्तव म्हणाले, की कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये मारुती आघाडीवर आहे, तर कंपनी मिड साईजच्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये मात्र कंपनीला संघर्ष करावा लागत आहे. मिड एसयुव्ही सेगमेंटमध्ये कामगिरी सुधारण्याची गरज आहे. यासाठी कंपनी यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मिड एसयुव्ही कार सादर करणार आहे.
आता उपाय योजना
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर वाहनांच्या सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, कंपनी मागील सीट सेफ्टी बेल्टच्या गरजेवर भर देईल.
सीट बेल्ट अनिवार्य
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मागील सीटच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट देखील अनिवार्य आहे. परंतु फार कमी प्रवासी त्याचे पालन करतात. श्रीवास्तव म्हणाले की, मारुती सुझुकी सेफ्टी फीचर्सबाबत अधिक लक्ष देउन त्याबाबत जागृतता करणार आहे.