Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुतीपासून स्कोडापर्यंत विविध कार्सवर बंपर डिस्काउंट… तुमची आवडती कार कोणती?

नवरात्री आणि सणासुदीच्या काळात कार कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. टाटा, महिंद्रा, मारुती, जीप, स्कोडा, रेनॉल्ट, ह्युंदाई या सर्व कार कंपन्यांनी नवीन कार खरेदीदारांवर डिस्काउंटचा अक्षरश: पाउस पाडला आहे. या महिन्यात कार खरेदी केल्यास ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.

मारुतीपासून स्कोडापर्यंत विविध कार्सवर बंपर डिस्काउंट… तुमची आवडती कार कोणती?
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 10:17 PM

मुंबई :  देशातील अनेक कार कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये नवीन कार (New Car) खरेदीवर भरघोस सूट देऊ केली आहे. मारुती, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा यांसारख्या अनेक कंपन्यांनी नवरात्री, दिसरा, दिवाळी (Diwali) आदी सणासुदीच्या काळात डिस्काउंट (Discount) ऑफर जारी केल्या आहेत. नवीन कार खरेदी करणारे ग्राहक या ऑफर्सच्या मदतीने 80,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. सवलतीच्या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट यांसारख्या विविध डिस्काउंटचा समावेश आहे. तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर या लेखातील डिस्काउंटबाबत माहिती जाणून घ्या…

  1. स्कोडा स्कोडाने त्यांच्या लाइनअपवर 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले आहे. कार खरेदीदार 4 वर्षांसाठी 25,000 रुपयांचा स्कोडा सर्व्हिस केअर पॅक, 15,000 चे एक्सचेंज बोनस आणि 15,000/10,000 कॉर्पोरेट सूट/लॉयल्टीत सूट दिली आहे. ही ऑफर Skoda Kushak आणि Skoda Slavia वर उपलब्ध असेल.
  2. फोक्सवॅगन फॉक्सवॅगनने टायगुनच्या निवडक प्रकारांवर 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस ऑफर केला आहे. दुसरीकडे डीलरशिप स्तरावर फोक्सवॅगन विटस्‌वर देखील काही ऑफर उपलब्ध असू शकतात.
  3. टाटा मोटर्स नवीन टाटा कारच्या खरेदीवर 40,000 रुपयांपर्यंत बचत होउ शकते. टाटा मोटर्सच्या बंपर डिस्काउंट ऑफरमध्ये Tiago, Nexon, Harrier आणि Safari सारख्या आलिशान कारचा समावेश आहे. कंपनीच्या डिस्काउंट ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट यांसारख्या सवलतींचा समावेश आहे.
  4. मारुती सुझुकी मारुती सुझुकी अल्टो, इको, एस-प्रेसो, सेलेरियो, स्विफ्ट, वेगन आर, ब्रेझा आणि डिझायरवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. नवीन मारुती कार खरेदीवर 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
  5. महिंद्रा महिंद्राही XUV300 या एसयुव्हीवर 62,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. यामध्ये 23,000 रुपयांचे डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, मोफत अॅक्सेसरीज आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.
  6. ह्युंदाई ह्युंदाईने 48,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट दिले आहे. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. Hyundai Grand Nios आणि Aura, i10 Nios, Aura CNG, Hyundai i20 सारख्या कारवर डिस्काउंट आहे.
  7. रेनॉल्ट Kwid, Triber आणि Kyger कारवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट आहे. सप्टेंबरमध्ये, Kwid वर 35,000 रुपये, Chiger वर 10,000 रुपये आणि Triber वर 50,000 रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
  8. होंडा होंडाने 27,500 पर्यंत एकूण सूट दिली आहे. ग्राहक ही सवलत Honda Amaze, Jazz, WRV, Honda City इत्यादींवर देण्यात आली आहे. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट उपलब्ध आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.