Toyota Innova Crysta 2023 : इंडीयाची फेव्हरेट फॅमिली कार नव्या फिचर्ससह रिलाँच होत आहे, बुकींग झाली सुरू

टोयोटा इन्वोहा क्रिस्टा कार खरेदी करण्याचे तुमचे नियोजन असेल तर या कारचे नविन मॉडेल नव्या सेफ्टी फिचर्ससह लवकरच लाँच होणार आहे. काय आहेत, जाणून घ्या या मॉडेलची वैशिष्ट्ये

Toyota Innova Crysta 2023 : इंडीयाची फेव्हरेट फॅमिली कार नव्या फिचर्ससह रिलाँच होत आहे, बुकींग झाली सुरू
INNOVAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 4:05 PM

दिल्ली : टोयोटा इन्वोहा क्रिस्टा कार ( Toyota Innova Crysta ) खरेदी करण्याचा विचारात असाल तर तुम्हाला आता या कारचे नवीन मॉडेल खरेदी करण्याची संधी आहे. या आघाडीची कार उत्पादक कंपनी टोयोटा मोटर प्रवाशांची आवडती इनोव्हा क्रिस्टा या फॅमिली फेव्हरेट कारला नव्या फिचर्ससह पुन्हा रिलॉंच करणार आहे. या कारला नवीन डीझाईन आणि नवीन इंजिनासह बाजारात आणण्यात येणार आहे. या कारच्या नव्या अद्ययावत व्हर्जनसाठी बुकींग देखील सुरू झाली आहे. नवीन लूकवाल्या टोयोटा इनोव्हाला अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

टोयोटा कंपनी इनोव्हा क्रिस्टा एमपीव्ही पुन्हा लॉन्च करणार आहे. या जपानी ऑटो कंपनीने अद्ययावत इनोव्हा क्रिस्टा साठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. या नवीन इनोव्हा 50,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक करता येणार आहे. Toyota Motor ने अद्याप Inova Crysta 2023 मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात ती अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. कार निर्मात्या कंपनीने इनोव्हाची डीझेल आवृत्ती आधी बंद केली होती. आणि नंतर काही महिन्यांपूर्वी हायब्रिड इंजिन लाँच केले आहे, आता कंपनी पुन्हा डिझेल इंजिनचे मॉडेल लाँच करणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये अधिक सुरक्षिततेसाठी सात एअरबॅग्ज पुरविण्यात आल्या आहेत.

या इनोव्हाचे डीझाईन फॉर्च्यूनर सारखे 

इन्वोहा क्रिस्टा कारच्या डिझाइन अनेक महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. तिचा फ्रंट लुक संपूर्णपणे बदललेला पाहायला मिळणार आहे. जुन्या इनोव्हा क्रिस्टा पेक्षा ती जास्त मजबूत असणार आहे. या फॅमिली कारता नवीन लूक फॉर्च्यूनर एसयूव्ही सारखा असणार आहे. या नविन इनोव्हा क्रिस्टा G, GX, VX आणि ZX नावाचे 4 मॉडल उपलब्ध होणार आहेत. हे नवीन मॉडेल्स 7 किंवा 8 सीटर क्षमतेचे असतील. टोयोटा एमपीव्हीला पाच रंगामध्ये लॉंच करण्यात येणार आहे. व्हाईट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपर व्हाइट, सिल्वर, एटीट्यूड ब्लॅक आणि अवंट गार्ड ब्रॉंझ अशा पाच रंगात ती उपलब्ध होणार आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...