India First Solar Car : भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवली , 45 मिनिटांत चार्ज होणार, 250 किमी धावणार
पुण्यातील स्टार्टअप कंपनीने बनवली पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार, चार्जिंग सुध्दा सुपरफास्ट, जाणून घ्या अधिक माहिती
मुंबई – ग्रेटर नोएडाध्ये सुरु असलेल्या Auto Expo 2023 मध्ये काही खास गाड्या दाखवण्यात आल्या. पुण्याच्या स्टार्टअप कंपनी (Pune startup company) वायवे मोबिलिटी (Vayve Mobilty) यांनी भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार (India First Solar Car) तयार केली असल्याचा दावा केला आहे. त्या कारमध्ये दोन व्यक्ती आणि एक मुलगा बसू शकतो. विशेष म्हणजे ही कार 45 मिनिटांत पुर्णपणे चार्ज होणार होणार आहे. त्याचबरोबर 250 किमी धावणार पर्यंत चालणार असल्याचा दावा स्टार्टअप कंपनीने केला आहे.
ही कार बॅटरीवर चालते, त्याचबरोबर सिंगल डोर कार आहे. सेम टू सेम टाटा नॅनो सारखी दिसायला आहे. खरीतर ही इलेक्ट्रीक कार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सौरऊर्जेवर चालवण्याचा ऑप्शन देण्यात आला आहे. तुम्हाला सोलार रुफ गाडीच्या वरच्या बाजूला लावता येणार आहे. त्याचबरोबर सोलर रूफ बॅटरीला चार्जिंगसाठी मदत करेल. तुम्हाला गाडी चार्जिंग करायची असल्यास ओपन स्पेसमध्ये गाडी उभी करावी लागणार आहे. त्यासाठी कंपनीकडून सोलर रूफ तुम्हाला वेगळं खरेदी करावं लागणार आहे.
सध्या त्या गाडीच्या टेस्ट सुरु आहेत. ही गाडी 2024 मध्ये कंपनी मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे. त्या गाडीमध्ये 6 kW लिक्विड-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर आहे. ती 16hp पावर आणि 40Nm चं पीक टॉर्क जेनरेट करते. इलेक्ट्रिक आणि सोलर कारमध्ये 14 kWh बॅटरीचा पॅक मिळतो. कारला एकदा चार्जिंग केल्यानंतर ही कार 250km किलोमीटरपर्यंत चालते. त्यामध्ये चार्जिंगसाठी 15A सॉकेट आहे.
घरच्या सॉकेटमधून सुध्दा ही कार चार तासात चार्जिंग केली जाऊ शकते. कंबाइंड चार्जिंग पद्धतीने 45 मिनिटामध्ये ही कार 80 टक्के चार्जिंग केली जाऊ शकते. चार्जिंग जोडण्यासाठी तुम्हाला Android Auto आणि Apple CarPlay सुध्दा उपलब्ध आहे. वायवे मोबिलिटी ही कंपनी पुढच्यावर्षी पुणे आणि बंगलोर या शहरात गाडी लॉंन्च करणार आहे. ज्यावेळी कार मार्केटमध्ये येईल त्यावेळी कारची किंमत ठरवण्यात येणार आहे.