Solar Car : ईव्ही कारवर लवकरच संक्रांत; सोलर कार मार्केट खाऊन टाकणार, सौर ऊर्जेवरील Vayve Eva चा फर्स्ट लूक पाहिलात का?

India First Solar Car Vayve Eva : EV वाहनांचा लवकरच गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे. भारताची पहिली Solar Car बाजारात येणार आहे. अवघ्या 45 मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर ठरणाार आहे.

Solar Car : ईव्ही कारवर लवकरच संक्रांत; सोलर कार मार्केट खाऊन टाकणार, सौर ऊर्जेवरील Vayve Eva चा फर्स्ट लूक पाहिलात का?
सोलर कार ची चर्चा
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:12 PM

भारतात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय शोधण्यात येत आहे. पर्यावरणपूरक पर्यायांवर संशोधन सुरू आहे. हायड्रोजन, इथेनॉल, ईव्ही वाहनांचा पर्याय समोर येऊ लागला आहे. आशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या हळूहळू वाढत आहेत. पण तरीही काही अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारताची पहिली Solar Car बाजारात येणार आहे. अवघ्या 45 मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर ठरणाार आहे. या कल्पनेला चालना मिळाली तर EV वाहनांचा लवकरच गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे.

Vayve Eva दिल्ली एक्स्पोमध्ये

Vayve Mobility ने नवीन आयडियाची कल्पना लढवली. इलेक्ट्रिक वाहनातच सौर ऊर्जेच्या वाहनाचा पर्याय समोर आणला आहे. नवी दिल्ली येथील भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही कार विविध बदलांसह देशासमोर येईल. 17 ते 22 जानेवारी दरम्यान हा एक्स्पो होणार आहे. यापूर्वी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये ईव्हाने लाखो चाहत्यांना सुखद धक्का दिल होता. ही एक कॉम्पॅक्ट आणि पर्यावरणपूरक कार आहे.

हे सुद्धा वाचा

शहरी भागातील वाहतूक अडथळ्यांची शर्यत, कमी जागा, अरूंद रस्ते, वाहनतळाची समस्या, पेट्रोल-डिझेलची वाढलेली किंमत, ईव्ही वाहनांच्या चार्जिंगची अडचण या सर्व अडचणी, या सर्व अडचणींचा विचार ही कार तयार करताना करण्यात आला आहे. कारचे हे कॉम्पॅक्ट व्हर्जन अनेकांचा प्रवासाचा खर्च वाचवणार आहे. या कारविषयी सध्या माध्यमात जितकी चर्चा सुरू आहे. त्यापेक्षा सोशल मीडियावर तिची लोकप्रियता अधिक आहे.

एक चार्जिंगमध्ये 250 किमीचा टप्पा

ही कार एका चार्जिंगमध्ये 250 किमीचा टप्पा पूर्ण करेल. तर एका वर्षात ती 3000 किमी धावेल. सौर ऊर्जेवर ही कार चार्ज होईल. या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुपरफास्ट चार्जिंग हे या कारचे वैशिष्ट्ये आहे.

अवघ्या 45 मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर ठरणाार आहे. पाच मिनिटांत ही कार 50 किमीने धावेल. या कारचा टॉप स्पीड 70 किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कारसाठी प्रति किलोमीटर 0.5 पैसे खर्च अपेक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षेवर ही कार खरी उतरेल असा विश्वास वयवे ईव्हाचे सीईओ आणि सहसंस्थापक निलेश बजाज यांनी व्यक्त केला आहे.

'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.