IONIQ 5: Hyundaiची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार, एका चार्जवर 350 किमी धावेल, अधिक माहिती जाणून घ्या…
IONIQ 5 ही Hyundai ची भारतात लाँच होणारी दुसरी इलेक्ट्रिक कार असेल. रिपोर्ट्सनुसार IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV कार एका चार्जवर 350 किमी पर्यंत प्रवास करू शकेल. याविषयी अधिक जाणून घ्या...
नवी दिल्ली : कोणतीही कार घ्याची असल्याच त्यासंदर्भात अधिक माहिती असावी लागते. कारचे फीचर्स, ब्रँड कोणता आहे, किंमत आपल्या बजेटमध्ये आहे का, याचाही विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटच्या कारविषयी सांगणार आहोत. दक्षिण कोरियाची कार कंपनी भारतात (India) आपली कार (Car) लाइनअप मजबूत करत आहे. कंपनीने नुकतेच Hyundai Tucson चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. रिपोर्ट्सनुसार Hyundai नवीन इलेक्ट्रिक SUV IONIQ 5 सादर करण्याच्या तयारीत आहे . आगामी IONIQ 5 ही Hyundai Kona नंतर भारतात दाखल होणारी कंपनीची दुसरी कार असेल. Kia EV6 चे घटक आणि पॉवरट्रेन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) मध्ये वापरले जाऊ शकतात. एका चार्जवर IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV 300-350 किमी अंतर कापेल. नवीन इलेक्ट्रिक SUV ची वैशिष्ट्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आगामी IONIQ 5 इलेक्ट्रिक कार संपूर्णपणे नॉक्ड डाउन (CKD) मार्गाने भारतात येईल. Hyundai च्या इलेक्ट्रिक e-GMP प्लॅटफॉर्मसाठी नवीन बनवलेल्या आधारावर, IONIQ 5 इलेक्ट्रिक कार Kia EV6 सह यांत्रिक घटक आणि पॉवरट्रेन पर्याय सामायिक करेल. IONIQ 5 मध्ये, ग्राहकांना अधिक जागा आणि आरामदायी केबिन मिळण्याची अपेक्षा आहे.
हायलाईट्स
- एका चार्जवर IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV 300-350 किमी अंतर कापेल
- IONIQ 5 मध्ये, ग्राहकांना अधिक जागा आणि आरामदायी केबिन
- ग्राहकांना बिग सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जर यात आहे
- डिजिट इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
- Hyundai ने IONIQ 5 लाँच किंवा किंमतीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
- IONIQ 5 ची अपेक्षित किंमत 50 लाखांपेक्षा कमी (एक्स-शोरूम) असू शकते.
- IONIQ 5 इलेक्ट्रिक कार Kia EV6 सह यांत्रिक घटक आणि पॉवरट्रेन पर्याय
IONIQ 5 ची वैशिष्ट्ये
IONIQ 5 उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्ट गतिमानतेच्या आधारे बाजारात मजबूत स्पर्धा देईल. आगामी IONIQ 5 मध्ये, ग्राहकांना बिग सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जर, डिजिट इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, कनेक्टेड कार टेक, पुश बटण स्टार्ट, सीट व्हेंटिलेशन यांसारखी अनेक छान वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
IONIQ 5: संभाव्य किंमत
Hyundai च्या नवीन इलेक्ट्रिक SUV कारमध्ये 169hp चा सिंगल मोटर सेटअप आणि 58kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. गाडीवाडीच्या मते, आगामी इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 300-350 किमी धावेल. Hyundai ने IONIQ 5 लाँच किंवा किंमतीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. IONIQ 5 ची अपेक्षित किंमत 50 लाखांपेक्षा कमी (एक्स-शोरूम) असू शकते.