‘या’ गाड्या 100000 रुपयांनी महागणार, 1 एप्रिलपासून नव्या किंमती
Isuzu Motors India ने जाहीर केले आहे की ते भारतात त्याच्या D MAX Regular Cab आणि D MAX S CAB किंमती वाढवणार आहेत.
मुंबई : जपानी वाहन निर्माती कंपनी Isuzu Motors India ने जाहीर केले आहे की ते भारतात त्याच्या डी-मॅक्स रेग्युलर कॅब (D MAX Regular Cab) आणि डी-मॅक्स एस-कॅबच्या (D MAX S CAB) किंमती वाढवणार आहेत. सध्याच्या एक्स-शोरूम किंमतीवर 1 लाख रुपयांची वाढ केली जाणार आहे. या गाड्यांच्या नवीन किंमती 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील. (Isuzu D-Max Regular Cab and S CAB Price Increase By Rs 1 Lakh)
सध्या Isuzu डी-मॅक्स रेग्युलर कॅबची किंमत 8.75 लाख रुपयांपासून सुरू होते, तर डी-मॅक्स एस-कॅबची किंमत 10.74 लाख रुपयांपासून (सर्व किंमती, एक्स-शोरूम दिल्ली) सुरु होते. इतर व्यावसायिक वाहनांच्या तुलनेत या किंमती खूपच जास्त आहेत. ब्रँडचे हे दोन्ही मॉडेल्स सध्या कंपनीच्या लाइन-अपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इझुझू मोटर्स इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्पादन वाढ, परिवहन आणि रसद यांच्या वाढीव खर्चामुळे वाहनांचे मूल्य वाढले आहे.
एकाच वर्षात दुसऱ्यांदा किंमती वाढवल्या
हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या बीएस 6 मॉडेलवर आधारित वाहनांच्या किंमती दुसऱ्यांदा वाढवल्या आहेत. कंपनीने यापूर्वी या वाहनांच्या किंमतीत जानेवारीत 10,000 रुपयांची वाढ केली होती. त्या वेळी कंपनीने किंमत वाढण्याचे मुख्य कारण म्हणून इनपुट आणि वाहनांचा उत्पादन खर्च वाढल्याचे कारण दिले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इसुझुने बीएस 6 श्रेणी सुरू केली होती, परंतु ती व्यावसायिक वाहनांसाठी मर्यादित होती. कंपनीने अद्याप देशात एमयू-एक्स एसयूव्ही आणि व्ही-क्रॉस लाइफस्टाइल पिक-अप ट्रकची बीएस 6 आवृत्ती सादर केली नाही. विशेष म्हणजे, एमयू-एक्स आणि डी-मॅक्स व्ही-क्रॉस दोन्ही दक्षिण-पूर्व आशियाई बाजारात नेक्स्ट जनरेशनच्या वेरिएंटमध्ये गेले आहेत. तथापि, कंपनीने अद्याप याची खात्री केली नाही की सर्व नवीन मॉडेल्स भारतात कधी दाखल होतील. अलीकडेच, MU-X चे बीएस 6 वेरिएंट भारतात टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले होते. जेणेकरून सध्याचे मॉडेल आणखी काही काळ अंडर-लॉन्च केले जाईल.
वाहनांच्या किंमती का वाढल्या?
नवीन वर्षाच्या सुरूवातीला बहुतांश वाहन कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे मागणीच्या प्रमाणात कार कंपन्यांना स्टीलचा पुरवठा होत नाही. त्यामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या. आता पुन्हा एकदा स्टीलची किंमत वाढली आहे, अशा परिस्थितीत अनेक वाहन कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढविण्याच्या मन: स्थितीत आहेत.
Land Rover ची शानदार Defender V8 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स#LandRover #Defender #DefenderV8https://t.co/fHtvISVBAx
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2021
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर
Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी
(Isuzu D-Max Regular Cab and S CAB Price Increase By Rs 1 Lakh)