इटलीची इलेक्ट्रीक स्कूटर भारतात होणार लॉंच, बॅटरीत आहे भन्नाट सुविधा, महाराष्ट्राच्या या शहरात कंपनीचा प्लांट
या नवीन इटालीयन कंपनीच्या बाईक थ्री डिफरन्ट मोडवर चालविण्याची सुविधा आहे. त्यात इको, कॉन्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन मोडची सुविधा आहे. फ्रंट आणि रेअर लँप एलईडी आहेत. या बाईकच्या बॅटरी खास वैशिष्ट्ये पूर्ण आहेत.
इटलीचा ‘टू व्हीलर ब्रँड’ Velocifero ( VLF )ने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. या स्कूटरचा मॅन्युफॅक्टरींग प्लांट कोल्हापूरात वसविण्यात येत आहे. येत्या सणासुदीच्या मोसमात या इलेक्ट्रीक स्कूटरच्या दोन आवृत्त्या बाजारात दाखल होत आहे.व्हीएलएफने भारतीय बाजारात KAW Veloce Motors Pvt.Ltd. या कंपनीशी पार्टनरशिप केली आहे. KAW Veloce Motors ही कंपनी भारतात या कंपनीच्या स्कूटरची निर्मिती आणि वितरण करणार आहे. या परदेशी ब्रॅंडचे भारतातील पहिली स्कूटर यंदाच्या दिवाळीच्या आधीच लॉंच होण्याची शक्यता आहे. टेनिस इलेक्ट्रीक स्कूटरच्या फॉर्ममध्ये ही इलेक्ट्रीक स्कूटर दाखल होणार आहे.
Italy च्या VLF कंपनीची भारतात आपले जाळे पसरविण्याची योजना आहे. टीयर-1 आणि टियर – 2 शहरात कंपनीला आपले उत्पादन विकायचे आहे. कंपनीला 15 डीलर शिप सुरु करणार असून मार्च 2025 च्या अखेरपर्यंत 50 डीलरशिप उभारण्यात येणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शनात सहभाग घेणार आहे.
टेनिस ई-स्कूटरची वैशिष्ट्ये
व्हीएलएफ कंपनी दोन्ही मॉडेलमध्ये चेंज करता येणार्या प्रत्येकी दोन 84 व्होल्टच्या लिथियम बॅटरी पुरविणार आहे. पहिल्या मॉडेल 1500 W मोटरची दर ताशी 45 किमीचा कमाल वेग धारण करणारे आहे. एका सिंगल चार्जिंगमध्ये या मॉडलची बाईक 60 किमी धावणार आहे. त्यामुळे शहरातल्या शहरात चालविण्यासाठी ही चांगली बाईक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दुसरे मॉडेल 4000W क्षमतेच्या बॅटरीचे असून एका सिंगल चार्जिंगमध्ये ते जर तर ताशी 40 किमी वेगाने चालविल्यास 100 किमी पर्यंत ती धावू शकेल असा कंपनीचा दावा आहे. बॅटरी संपू्र्ण चार्ज करण्यासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागणार आहे.
किंमत गुलदस्त्यात
हाय टेन्सील स्टील फ्रेमच्या Tennis 1500W चे वजन बॅटरीसह केवळ 88 किलोग्रॅम इतके आहे. तर 4000W मॉडेलचे वजन 10 किलोग्रॅमने जास्त आहे. दोन्ही दिशेच्या चाकांना डिस्क ब्रेक आहे. स्पीडो मीटरसाठी 5.5 इंचाचा डिजीटल TFT डिस्प्ले आहे. रायडरला थ्री डिफरन्ट मोडवर ही स्कूटर चालविण्याची सुविधा आहे. त्यात इको, कॉन्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन मोडची सुविधा आहे. बाईकचे फ्रंट आणि रेअर लँप एलईडी आहेत. या मॉडेलची किंमत काय असणार आहे हे कंपनीने कळविलेले नाही.