शानदार फीचर्स, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी, Electric Jaguar I-Pace लाँचिंगसाठी सज्ज
जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे
मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. (Jaguar I-Pace Electric SUV Launching on march 23 Tomorrow, know price and specs)
जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (Jaguar Land Rover India) त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) 9 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, ही लाँच डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कार 23 मार्च 2021 रोजी (उद्या) लाँच केली जाणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्यामुळे उद्या ही बहुप्रतीक्षित कार लाँच होणार आहे. दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
45 मिनिटात 80 टक्के चार्ज होणार
लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता भारतात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी कंपनी उत्सूक आहे. Jaguar I-Pace मध्ये 90kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी 100kW रॅपिड चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे 400 पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.
बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी
आय-पेस च्या 90 केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वारच्या आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे 696 एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली जाईल. ही 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.
2 Days to go for the launch of #IPACE in India. For this launch, we have developed an exciting, virtual concept of a future facing and sustainable urban metropolis called #Jaguar Futuropolis. See you there on 23rd March. Know more: https://t.co/LFhcCv0FZt#FutureIsElectric #EV pic.twitter.com/9x5FJIkAF7
— Jaguar India (@JaguarIndia) March 21, 2021
इतर बातम्या
Audi ची दमदार कार भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
सिंगल चार्जवर 100KM धावणार, Komaki ची इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच
(Jaguar I-Pace Electric SUV Launching on march 23 Tomorrow, know price and specs)