Jeep ची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास

जगातील प्रत्येक प्रमुख वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicles) लक्ष केंद्रित करत आहेत. त्यात आता अमेरिकन SUV निर्माता जीपची (Jeep) भर पडली आहे.

Jeep ची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास
Electric Jeep
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 5:53 PM

मुंबई : जगातील प्रत्येक प्रमुख वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicles) लक्ष केंद्रित करत आहेत. त्यात आता अमेरिकन SUV निर्माता जीपची (Jeep) भर पडली आहे. जीपची मूळ कंपनी असलेल्या स्टेलांटिस ग्रुपने अलीकडेच अॅमस्टरडॅममध्ये एका सादरीकरणादरम्यान आगामी वर्षांसाठीच्या आपल्या व्यावसायिक योजनांचा खुलासा केला आणि त्याच सादरीकरणात कंपनीने जीप ब्रँडच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी आपल्या आवश्यक योजनांचा खुलासा केला. कॉर्पोरेट ग्रुपमध्ये, क्रिसलर, डॉज, जीप, मासेराती आणि फियाट सारख्या ब्रँड्ससह इतर 10 ब्रँड्सने जीपचा पहिला ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर सादर केला. घोषणेनुसार, इलेक्ट्रिक जीप (Electric Jeep) 2023 च्या पहिल्या सहामाहीत बाजारात पदार्पण करेल.

आत्तापर्यंत, Stellantis किंवा जीपने आगामी क्रॉसओव्हरचे नाव जाहीर केले नाही परंतु त्यांनी जाहीर केले आहे की ईव्ही क्रॉसओव्हर सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च केली जाईल. कंपन्यांनी मॉडेलची किंमत, बॅटरी, मोटर, रेंज किंवा फीचर्स याविषयी कोणतीही माहिती देण्याचे टाळले असताना, आम्हाला आगामी EV चे दोन फोटो मिळाले आहेत.

शानदार डिझाईन

डिझाईनच्या बाबतीत, पहिल्या ऑल-इलेक्ट्रिक जीपला पुढील बाजूस सात स्लॉटेड ग्रिलसह बॉक्सी लुक मिळेल. मॉडेल EV असल्याने, स्लॅट्स आता चांगल्या एरोडायनॅमिक्ससाठी बंद करण्यात आले आहेत, नवीन जीप कंपासमध्ये हे बंद ग्रिल देखील पाहायला मिळालं होतं. ग्रिलव्यतिरिक्त, वाहनाच्या फ्रंट फॅशियाला एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएलचा सेट मिळतो, त्यानंतर एक स्लीक फ्रंट बंपर डिझाइन आहे. बंपरच्या तळाशी सिल्वर स्किड प्लेट्ससह हनी-मेश सारखी ग्रिल आहे. ग्रिलवर काळ्या पेंटसह एक हुड देखील आहे जो EV विशिष्ट बॅजच्या रूपात दिसतो.

ही एसयूव्ही जीपसारखी दिसते. याला मोठ्या स्क्वेअर-ऑफ व्हील आर्च देखील मिळतात, ज्याला डुअल ट्यून अलॉय व्हील मिळतात आणि बाजूंना जाड काळ्या क्लेडिंग आहेत. या कारच्या मागील बाजूचं डिझाईन चेरोकी किंवा रेनेगेड सारखं आहे. EV जीपच्या बॅक-एंड डिझाईनमध्ये LED टेललॅम्पचा सेट, त्याच्या भोवती X-डिटेल्स, निळा E बॅज, जीप सिग्नेचर, सिल्व्हर स्किड प्लेटसह ब्लॅक-आउट रिअर बंपर मिळेल.

इतर बातम्या

Rohit Sharma New Car: रोहित शर्माने खरेदी केली भारताच्या जर्सीला साजेशी आलिशान कार, किंमत मुंबईतल्या 3BHK फ्लॅटएवढी

घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा ‘एमजी एक्स्पर्ट’ प्लॅटफॉर्म लाँच

बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.