फक्त 56 हजारांत घरी आणा मारुती अल्टो; भरावा लागेल ‘इतका’ ईएमआय
भारतात सध्या सीएनजी कारला मागणी वाढली आहे. सीएनजी कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त आणि चांगला मायलेज असलेली सीएनजी हॅचबॅक मारुती अल्टो 800 एलएक्सआय ऑप्शनल एस-सीएनजीला ग्राहकांकडून खूप मागणी आहे. 1 लाख रुपयांपेक्षा कमी डाउनपेमेंटमध्ये तुम्ही ही कार घरी आणू शकता.
भारतासह जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांसाठी सीएनजी (CNG) कार हा एक चांगला पर्याय ठरत आहे. तुम्हालाही कमी किमतीत चांगली सीएनजी कार घ्यायची असेल, तर मारुती सुझुकी अल्टो 800 एलएक्सआय एस-सीएनजी (Maruti Alto) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही एकरकमी पैसे देण्याऐवजी फायनान्स देखील करू शकता आणि यासाठी एकूण खर्चाच्या 10 टक्के म्हणजेच 60 हजार रुपये डाऊनपेमेंट (Downpayment) भरावे लागणार आहे. कर्ज घेतल्यानंतर तुम्ही त्याचे हप्ते पाडून दरमहा काही हजार रुपयांचा ईएमआय भरु आपली हक्काची गाडी घरी आणू शकणार आहात. या लेखातून आम्ही तुम्हाला मारुती अल्टो सीएनजी कारसाठी फायनान्सशी संबंधित आवश्यक माहिती देणार आहोत.
मारुती अल्टोला चांगली मागणी
मारुतीची सर्वात स्वस्त कार, मारुती अल्टोची किंमत आणि वैशिष्ट्यांमुळे तिला ग्राहकांमध्ये अधिक मागणी आहे. मारुती अल्टो Std (O), LXi (O), VXi आणि VXi + सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या एकूण 5 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, त्यांची किंमत 3.39 लाख रुपयांपासून 5.03 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे. यामध्ये हॅचबॅकमध्ये 796 सीसी इंजिन मिळत असून ते 47.33 बीएचपी पॉवर जनरेट करू शकते. मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायामध्ये देखील ही कार उपलब्ध आहे. मारुती अल्टो LXI ऑप्शनल S-CNG चे मायलेज 31.59 लिटर प्रति किलोमीटर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ईएमआय किती भरावा लागणार?
मारुती अल्टोच्या सीएनजी मॉडेल एलएक्सआय Opt S-CNG ची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख असून, ऑनरोड किंमत 5.56 लाख इतकी आहे. ‘कारदेखो’ ईएमआय कॅलक्यूलेटरनुसार, जर तुम्ही अल्टो एलएक्सआय ऑप्शनल सीएनजीला 56,000 रुपये 10 टक़्के डाउनपेमेंट सह खरेदी केली तर तुम्हाला उर्वरीत रक्कम भरण्यासाठी कर्ज मिळू शकते. या कर्जाचा व्याज दर जर 9.8 टक्के धरला. तर तुम्हाला पाच वर्षांसाठी 10,553 रुपये एवढा ईएमआय बसेल.