कार इन्शुरन्स रिन्यू करण्यापूर्वी नक्की जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा व्हाल त्रस्त
Car Insurance Renewal : कार इन्शुरन्स रिन्यू करताना या गोष्टींची विशेष काळजी घेतली नाही तर भविष्यात पश्चाताप करावा लागू शकतो.
नवी दिल्ली : तुमच्या घरात कार (car) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आजच्या काळात, प्रत्येक कार मालकाने आपल्या कारचा विमा (insurance) अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर कारची देखभाल घेण्यापासून ते कारच्या इन्शुरन्सपर्यंत कारची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा लोक कार इन्शुअरन्स रीन्यू (insurance renewal) करताना घाईत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
कारचा इन्शुरन्स घेताना या गोष्टींची घ्या काळजी
अनेक एजन्सी आणि ऑनलाइन पोर्टल आहेत जे कार विमा ऑफर करत आहेत किंवा दावा करत आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम इन्शुरन्स निवडण्यासाठी आपल्याला त्याबद्दल आवश्यक माहिती मिळणे आवश्यक आहे. विमा देणाऱ्या व्यक्तीची सत्यता पडताळण्याचा एक मार्ग म्हणजे IRDAI च्या वेबसाइटवर त्यांचा नोंदणी क्रमांक आणि CIN पाहणे.
नो-क्लेम बोनस बेनिफिट्स
विमा कंपन्या सामान्यतः त्यांच्या मागील पॉलिसी कार्यकाळात क्लेम फ्री राहिलेल्या वापरकर्त्यांना रिन्युअल डिस्काऊंट देतात. नो-क्लेम बोनस लाभ हा सर्वसमावेशक कार विम्याचा एक भाग आहे ज्यामध्ये थर्ड पार्टी लाएबिलिटी, पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर आणि ओन डॅमेज म्हणून ओळखले जाणारे अतिरिक्त कव्हर दोन्ही समाविष्ट आहे.
ॲडव्हान्स रिन्यू करावे
वाहनासाठी विमा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या प्रकरणात, तुम्ही इन्शुरन्स कालबाह्य होण्यापूर्वी त्याचे रिन्युअल केले पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुमचा अपघात झाला असेल तर तुम्ही विम्यासाठी दावा करू शकता. लक्षात घ्या की तुम्ही वेळेवर वाहन विम्याचे नूतनीकरण केले नाही तर वेळ आल्यावर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
इन्शुरन्स पॉलिसी कंपेअर करून पहावी
तुम्ही कोणत्याही कंपनीकडून वाहन विमा घेऊ शकता, पण त्याआधी या किमतीत इतर कंपन्या तुम्हाला किती फायदे देत आहेत हे काळजीपूर्वक तपासा. याशिवाय कंपनीचे ग्राहक कंपनीशी संपर्क साधून सर्व माहिती मिळवू शकतात. याशिवाय तुम्ही इतर लोकांचाही सल्ला घेऊ शकता.