Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata पाठोपाठ Kia देखील खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली किफायतशीर इलेक्ट्रिक कार लाँच करणार

दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी किया (Kia) भारतीय बाजारपेठेतल्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कंपनी लवकरच नवीन किया ईव्ही 6 (Kia EV6) प्योर इलेक्ट्रिक SUV ला CBU (कंप्लीटली बिल्ट-अप यूनिट) म्हणून सादर करण्याच्या विचारात आहे.

Tata पाठोपाठ Kia देखील खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली किफायतशीर इलेक्ट्रिक कार लाँच करणार
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Kia
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:12 PM

मुंबई : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी किया (Kia) भारतीय बाजारपेठेतल्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कंपनी लवकरच नवीन किया ईव्ही 6 (Kia EV6) प्योर इलेक्ट्रिक SUV ला CBU (कंप्लीटली बिल्ट-अप यूनिट) म्हणून सादर करण्याच्या विचारात आहे. एका नवीन मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Kia भारतीय बाजारात एक छोटी एसयूव्ही ईव्ही (SUV EV) लाँच करण्याची योजना आखत आहे. या कारचे सांकेतिक नाव (कोडनेम) AY ठेवण्यात आले आहे. नवीन Kia छोटी इलेक्ट्रिक SUV 2025 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ईव्हीची डेव्हलपमेंट सुरू झाली आहे. नवीन इलेक्ट्रिक वाहन फ्लेक्सिबल प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे मास मार्केट एंट्री-लेव्हल पेट्रोल SUV ला देखील सपोर्ट करेल.

नवीन लहान EV अजूनही विकसित होत असताना, Kia 2022 मध्ये भारतात EV6 सादर करून EV स्पेसमध्ये विस्तार करेल. मारुती सुझुकी आणि टोयोटा यां कंपन्या देखील याच वर्षी 2025 च्या आसपास इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करतील. टाटा मोटर्सने सध्या ईव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केलेली उत्पादने जवळपास 90% मार्केट शेअर बाळगून आहेत. 2025 पर्यंत, टाटा मोटर्स आणि महिंद्राची भारतीय बाजारपेठेत सुमारे 12 इलेक्ट्रिक वाहने असतील.

इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये धमाका करणार

जागतिक स्तरावर, 2030 पर्यंत 14 इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचे किआचे उद्दिष्ट आहे. या वर्षी, Kia ने भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांसाठी A+ सेगमेंट EV किंवा एंट्री SUV EV, एक EV पिक-अप ट्रक आणि विकसित बाजारपेठांसाठी दुसरे मॉडेल मंजूर केले आहे. भारत 2021 मध्ये Kia साठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. Kia इंडिया जागतिक वाढीसाठी स्पर्धा करत आहे जी Kia च्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे 10% आणि त्यांच्या एकूण महसुलाच्या सुमारे 8% आहे.

80000 कार निर्यात करण्याचे उद्दिष्ट

Kia ने भारतातून सुमारे 80,000 कार निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी सध्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. Kia जागतिक बाजारपेठेत Carence MPV ची निर्यात देखील सुरू करेल. किआ Carence च्या आधीच भारतीय बाजारात सोनेटच्या रूपात एंट्री-लेव्हल एसयूव्ही विकते.

इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये एंट्रीसाठी Hyundai ने कंबर कसली

गेल्या वर्षीच्या शेवटी, Kia ची मूळ पॅरेंट कंपनी ह्युंडई इंडियाने (Hyundai India) देखील एंट्री लेव्हल SUV लाँच करण्याची घोषणा केली आहे. Kia प्रमाणे, Hyundai ने देखील डिटेल्स उघड केले नाहीत. पण मिळालेल्या माहितीनुसार ती एक छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. Nexon EV ची देशातील प्रचंड मागणी लक्षात घेता, Hyundai आणि Kia भारतासाठी व्हेन्यू आणि सॉनेटचे नवीन इलेक्ट्रिक व्हर्जन्स देखील लाँच करू शकतात.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.