अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत…. अनेक दिग्गजांची पसंती असणाऱ्या या SUV मध्ये नेमकं आहे तरी काय ? जाणून घ्या फीचर्स

Toyota Land Cruiser LC300 ही कंपनीने 2021 मध्ये प्रथमच जागतिक बाजारपेठेत सादर केली होती. तिचे लेटेस्ट मॉडेल हे मागील ऑटो एक्सपो दरम्यान सादर करण्यात आले होते. अमिताभ बच्चन ते सलमान खान यांच्या ताफ्यात या एसयूव्हीचा समावेश आहे.

अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत.... अनेक दिग्गजांची पसंती असणाऱ्या या SUV मध्ये नेमकं आहे तरी काय ? जाणून घ्या फीचर्स
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट भारतीय बाजारपेठेत झपाट्याने लोकप्रिय होत आहे यात काहीच शंका नाही. सामान्य ग्राहकांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत, बहुतांश लोक हे एसयूव्ही कारमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय बाजारपेठेतील (Indian Market) एसयूव्ही विभागाचे वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यामध्ये मिनी. एसयूव्ही मायक्रो, कॉम्पॅक्ट, मिड-साईज किंवा फुल साइझ यासह SUV चे प्रकार पहायला मिळतात. पण जेव्हा एका प्रॉपर SUV बद्दल आपण बोलतो, तेव्हा एकच नाव तोंडी येते. त्याच SUV ची आज ओळख करून घेणार आहोत… विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खानपासून बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांच्या (celebrities)ताफ्यात ही गाडी सामील आहे.

आपण जपानी ऑटोमेकर टोयोटा कंपनीच्या प्रसिद्ध एसयूव्ही लँड क्रूझरबद्दल बोलत आहोत, जगभरात या एसयूव्हीच्या लोकप्रियतेची काही तुलनाच नाही. ही दमदार एसयूव्ही जवळपास सगळ्यांनाच आवडते. गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये, टोयोटाने आपली नवीन लँड क्रूझर LC 300 भारतीय ग्राहकांसाठी सादर केली. अतिशय आकर्षक लुक, पॉवरफुल इंजिन आणि हंकी स्टाइलमध्ये सादर करण्यात आलेल्या या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत किंमत सुमारे 2.10 कोटी रुपये आहे. GA-F प्लॅटफॉर्मवर आधारित चार चाके आणि बॉक्सी डिझाइन असलेली या SUV मध्ये अनेक आकर्षक फीचर्स आणि वैशिष्ट्ये आहेत.

दिग्गजांची पहिली पसंती : 

हे सुद्धा वाचा

लँड क्रूझर ही गाडी तिचे शक्तिशाली इंजिन, आरामदायी राइड आणि मस्क्यूलर स्टॅन्समुळे सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, सलमान खानच्या मालकीच्या लँड क्रूझर मॉडेलला अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ बनवण्यात आले आहे, म्हणजेच ती कस्टमाइज्ड एसयूव्ही आहे. याशिवाय अमिताभ बच्चन आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण हे देखील वेळोवेळी टोयोटा लँड क्रूझरमधून प्रवास करताना दिसतात. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लँड क्रूझरचा समावेश त्यांच्या ताफ्यात केला आहे. या SUV मध्ये एवढं काय खास आहे, ते जाणून घेऊया.

कशी आहे Toyota Land Cruiser LC 300 : 

Toyota Land Cruiser LC 300 ही कार कंपनीने 2021 साली पहिल्यांदा जागतिक बाजारपेठेत सादर केली होती. मात्र भारतीय बाजारात ती मागील ऑटो एक्स्पो दरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती. SUV GA-F बॉडी-ऑन-फ्रेम आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यामुळे ती तिच्या मागील मॉडेलपेक्षा सुमारे 200 किलो हलकी बनते. कंपनीने नवीन लँड क्रूझरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे, त्याला आकर्षक टेल लाईट्ससह नवीन हेडलाइट्स आणि क्रोमने सुशोभित फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत.

या SUV च्या डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर, या SUV ला क्रोम इन्सर्टसह एक मोठा फ्रंट ग्रिल, एलईडी DRL सह चौकोनी एलईडी हेडलॅम्प, रॅपराउंड एलईडी टेललाइट्स आणि 20-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत, जे त्याच्या साइड प्रोफाइलला मजबूत लूक देतात. 20-इंच चाके SUV ची उंची वाढवतात, जी SUV ला कोणत्याही प्रकारच्या रस्त्याच्या स्थितीत आरामदायी प्रवासासाठी उत्तम प्रकारे तयार करते.

पॉवर , परफॉर्मन्स आणि 10 गिअर : 

लँड क्रूझर LC300 मध्ये, कंपनीने 3.3-लीटर V6 डिझेल इंजिन वापरले आहे जे 305 bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे कंपनीच्या नवीन TNGA प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे, जे हलके तर आहे पण त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे.

या एसयूव्हीमध्ये असलेला मोठा ड्युअल-टोन बेज रंगीत डॅशबोर्ड आणि मध्यवर्ती ठेवलेल्या 12-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टममुळे तुम्हाला अनेक वैशिष्ट्ये नियंत्रित करता येतात. या इन्फोटेनमेंट सिस्टीम तुम्हाला अनेक वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतात. ही इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्लेला सपोर्ट करते. त्याचा सेंटर कन्सोल पुन्हा डिझाइन करण्यात आला आहे. फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर टेलगेट, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, हीटिंग आणि वेंटिलेशन फंक्शन्स केबिनला उत्तम बनवतात.

दमदार सेफ्टी : 

SUV च्या सेफ्टी किटमध्ये 10 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह मल्टी-टेरेन अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS),व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल (VSC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट आणि पार्किंग असिस्ट ब्रेक समाविष्ट आहेत. कंपनीने या SUV ला Advanced Driving Assistance System (ADAS) ने सुसज्ज केले आहे.

नवीन Toyota Land Cruiser LC 300 भारतात कम्प्लीट बिल्ट युनिट (CBU) म्हणून सादर करण्यात आली आहे. ही एसयूव्ही बाजारात लँड रोव्हर डिफेंडर, रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ जी-वॅगन, लेक्सस एलएक्स 570, बीएमडब्ल्यू एक्स7 या मॉडेल्सशी स्पर्धा करते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.