केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:58 PM

नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, आता दिल्लीमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर Komaki ने मार्केटमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटरल लाँच केली आहे. Komaki SE असं या स्कूटरचं नाव असून या स्कूटरची किंमत 96,000 रुपये इतकी आहे. (Komaki SE High-Speed Electric Scooter Launched In India; Priced At 96,000 rupees)

Komaki SE या स्कूटरची मार्केटमध्ये 125cc स्कूटर्ससोबत टक्कर होणार आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 3 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर मिळेल. जी डिटॅचेबल लिथियम आयन बॅटरी पॅकसह येते. Komaki SE या स्कूटरचं टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतकं आहे, तर ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95-125 किमीपर्यंतची रेंज देते.

मोटरच्या पॉवर आऊटपुटबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. Komaki SE मध्ये फ्रंट Glove बॉक्स मिळेल जो यूएसबी चार्जिंग पोर्टसह मिळतो. यामध्ये तुम्हाला दोन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच तुम्हाला ऑनबोर्ड सेल्फ डायग्नॉसिस सिस्टिमही दिली आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला सर्विस रिमायंडरदेखील देण्यात आला आहे.

शानदार फीचर्स

या स्कूटरमध्ये तुम्हाला LED डिस्प्ले, मल्टीमीडिया कंट्रोल स्विच आणि इनबिल्ट ब्लुटूथ स्पीकर्स देण्यात आले आहेत. स्कूटर रिमोट लॉकिंग आणि अँटी थेफ्ट सिस्टिमसह सादर करण्यात आली आहे. सस्पेंशन ड्युटीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्क्स अपफ्रंट आणि रियरमध्ये ट्विन शॉक्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. कोमाकीने म्हटलं आहे की, SE फुल चार्ज होण्यासाठी केवळ 1.5 यूनिट्स विजेचा वापर करते.

Komaki SE ची मार्केटमध्ये Okinawa iPraise+, Ampere Magnus Pro, BGauss B8, Odysse Hawk Lite आणि इतर स्कूटर्ससोबत टक्कर होणार आहे. या सर्व स्कूटर्सची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपास आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

(Komaki SE High-Speed Electric Scooter Launched In India; Priced At 96,000 rupees)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.