KTM Price Hike : पुन्हा KTMनं बाईकच्या किमती वाढवल्या, या महिन्यातील वाढ जाणून घ्या…

या वर्षी मे महिन्यात KTM आणि Husqvarna बाईकच्या किमतीत झालेल्या वाढीप्रमाणे नवीनतम दरवाढ नाही. नुकत्याच झालेल्या दोन्ही किमती वाढवून केटीएम मोटारसायकली काही महिन्यांपूर्वीच्या तुलनेत 8,567 रुपयांनी महागल्या आहेत.

KTM Price Hike : पुन्हा KTMनं बाईकच्या किमती वाढवल्या, या महिन्यातील वाढ जाणून घ्या...
KTM Price HikeImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 12:52 PM

मुंबई : बाईक (Bike) घ्यायची म्हटल्यावर मार्केटमधील चढ उतार, गाड्यांच्या वाढलेल्या किमती, कमी झालेल्या किमती, याकडे देखील लक्ष द्यावं लागतं, कारण, यामुळे आपल्याला कमी दरात चांगली बाईक मिळू शकते. कारण, अनेक कंपन्यांच्या वेगवेगे नविन्य देणाऱ्या बाईक असतात. एखाद्या बाईकची किंमत (Bike Price) कमी असले, तर दुसऱ्या बाईकमध्ये नवीन टेक्नॉलॉजी असू शकते. दरम्यान, एका कंपनीच्या बाईकच्या किंमती वाढल्याची माहिती आहे. याचविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. केटीएम (KTM) ने जुलै 2022 पासून सर्व मोटारसायकलींच्या किमती वाढवल्या आहेत. ऑस्ट्रियन दुचाकी निर्मात्यानं दोन महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात (India) आपल्या बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. ताज्या दरवाढीमध्ये कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती 1,427 रुपयांवरून 2,148 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. या दरवाढीमुळे आरसी, ड्यूक आणि अॅडव्हेंचर सीरिजच्या किमती वाढल्या आहेत.

जुलै 2022 मध्ये KTM मोटरसायकलच्या नवीन किमती

(एक्स-शोरूम नवी दिल्ली किमती)

मोटरसायकल नवीन किंमत (रु.) केटीएम आरसी 1251,88,640 KTM RC 200 2,14,688 KTM RC 390 3,16,070 KTM 125 ड्यूक 1,78,041 केटीएम 200 ड्यूक 1,91,693 केटीएम 250 ड्यूक 2,37,222 KTM 390 Duke 2,96,230 KTM 250 Adventure 2,44,205 KTM 390 Adventure 3,37,043

कंपनीच्या लाइन-अपमध्ये, KTM RC 200 आणि 200 Duke च्या किमतींमध्ये किमान 1,427 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर RC 125 येतो, ज्याची किंमत 1,779 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. येथे 125 Duke, 250 Duke आणि 250 Adventure आहेत. ज्यांच्या किमती या महिन्यात 2,099 रुपयांनी वाढल्या आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या नवीन-जनरल RC 390, 390 Duke आणि 390 Adventure च्या किमतीत सर्वाधिक 2,148 रुपयांची वाढ झाली आहे.

या वर्षी मे महिन्यात KTM आणि Husqvarna बाईकच्या किमतीत झालेल्या वाढीप्रमाणे नवीनतम दरवाढ नाही. नुकत्याच झालेल्या दोन्ही किमती वाढवून केटीएम मोटारसायकली आता काही महिन्यांपूर्वीच्या तुलनेत 8,567 रुपयांनी महागल्या आहेत. दरवाढीव्यतिरिक्त, इतर कोणत्याही बाइकमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

कोणतीही बाईक घ्यायची असल्यास अशा प्रकारे किमती पाहणं महत्वाचं ठरतं. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक देखील बघायला मिळतील आणि तुम्हाला नवीन बाईकमध्ये अधिकच्या गोष्टी देखील मिळू शकतील. कारण, बाईक घेताना आपण अनेक कंपन्यांच्या बाईक पाहिल्यास आपल्याला त्यात निवड करताना पैसे आणि फीचर्स पाहून निवड करता येते. विशेष म्हणजे आपल्याला यात आपल्या बजेटमध्ये बाईक बघण्यास सोपं देखील जातं. त्यामुळे केटीएमच्या किमती तुम्ही जाणून घेतल्या आहेत. त्या तुम्हाला फादेशीर ठरू शकतं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.