Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पूर येऊ दे नाही तर डोंगरदऱ्या, प्रवास थांबणार नाही, नवीन तगडी सुव्ह दाखल, किंमत किती ?

पुराचे पाणी असू दे किंवा नदीचा रस्ता, डोंगरदऱ्या या सर्वांतून सहज मार्ग काढणारी जग्वार लॅण्ड रोव्हरने देशात नवी डिफेंडर ऑक्टा एसयुव्ही लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनाने सज्ज असलेल्या या एसयूव्हीची प्रारंभिक किंमत धक्कादायक आहे.

आता पूर येऊ दे नाही तर डोंगरदऱ्या, प्रवास थांबणार नाही, नवीन तगडी सुव्ह दाखल, किंमत किती ?
Land Rover Defender Octa Price & Features
Follow us
| Updated on: Mar 26, 2025 | 7:00 PM

Land Rover Defender Octa:नव्या लॅण्ड रोव्हर ऑक्टा एसयूव्हीने आता आकारात थोडा बदल केला आहे. रेग्युलर डिफेंडरच्या तुलनेत ऑक्टा 68 मिमी जास्त रुंद आहे आणि 28 मिमी उंच आहे. कंपनीने दावा केला आहे की एसयुव्ही एक मीटर खोल पाण्यात देखील सहज धावू शकते…ग्राहक डिफेंडर ऑक्टा एडिशन वन देखील खरेदी करु शकतात, ही केवळ प्रोडक्शनच्या पहिल्या वर्षीच मिळणार आहे.

OCTA व्हेरीएंट डिफेंडर फॅमिलीतील सर्वात टॉपवर आहे. ही एसयुव्ही तिच्या पॉवर आणि परफॉर्मेंससाठी ओळखली जाते. पाच दरवाजे असलेल्या ११० बॉडी स्टाईलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्टाची बुकींग गेल्यावर्षी जुलैमध्ये सुरु केली होती. आता तिला अधिकृत रित्या बाजारात विक्रीसाठी उतरवले आहे. विशेष म्हणजे पहिल्या बॅचचे सर्व युनिट्स विक्री झाले आहेत. म्हणजे फर्स्ट बॅच सोल्ड आऊट झाली आहे. आता कार बुक करणाऱ्यांना डिलीव्हरीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

Land Rover Defender Octa Price & Features:

हे सुद्धा वाचा

2.5 टन वजनाच्या या एसयूव्हीचे एक्सटीरियर मध्ये चांगला एप्रोच आणि डिपार्चर एंगल, लांब राईड हाईट, रुंद स्टांस, एक्सटेंडेड व्हील आर्च, नवीन ग्रिल, क्वाड टिप एग्जॉस्ट या सुविधा मिळत आहेत. या एसयुव्हीला कंपनीने २० ते २२ इंचाचे के व्हील साईजसह सादर केले आहे. ज्यामुळे याच्या साईड प्रोफाईलला चांगले बनविण्यास मदत करतात.याशिवाय सिग्नेचर ग्राफीक पॅनलवर मशिनी आणि सँडब्लास्टेड टायटेनियम डिस्कच्या आता देखील एक चमकदार ब्लॅक डायमंड सह आणखी एक घेरलेले डायमंड ग्राफीक्स देखील देण्यात आले आहे.

कलरचे पर्याय काय ?

Defender Octa ला दोन स्पेशल कलर ऑप्शन सह बाजारात उतरविण्यात आले आहे.त्यात मेटॅलिक फिनिशने सजवले आहे. कलर पॅलेटमध्ये पेट्रा कॉपर आणि फरो ग्रीन, कार्पेथियन ग्रे सह (Carpathian Grey) सह ग्लॉस नार्विक ब्लॅकमध्ये कॉन्ट्रास्ट रुफ आणि टेलगेटचा समावेश आहे. याशिवाय, ग्राहक आपल्या एसयूव्हीला ऑप्शनल मॅट प्रोटेक्टिव फिल्म सह कस्टमाईज देखील करु शकतात.

पॉवर आणि परफॉर्मेंस…

नवीन डिफेंडर ऑक्टा मध्ये 4.4-लिटर ट्विन-टर्बो माईल्ड-हायब्रिड V8 इंजीन दिले आहे. जे 620 बीएचपीची पॉवर आणि 800Nm चा टॉर्क जेनरेट करते. या इंजिनला 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गियरबॉक्सने जोडले आहे. ही एसयू्व्ही केवळ 4 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते.

1 मीटर खोल पाण्यात पळणारी SUV…

या गाडीत 6D डायनेमिक सस्पेंशन, हॅव्ही रीवर्क केलेले चेसिस आणि सस्पेंशन कंपोनेंट दिले आहे. या SUV साठी करुन डेव्हलप केलेले खास मोठे टायर दिले आहेत. रेगुलर डिफेंडर एसयुव्हीच्या तुलनेत ऑक्टा 68 मिमी जास्त रुंद आणि 28 मिमी ऊंच आहे. हीची वॉटर वेडिंग कॅपेसिटी 1 मीटर आहे. म्हणजे कोणत्याही अन्य डिफेंडरच्या तुलनेत ही कार पाण्याच्या आत 100 मिमी जास्त खोलपर्यंत उतरु शकते.या कारमध्ये 323 मिमीचे ग्राऊंड क्लियरन् देखील देण्यात आले आहेत.

किंमत किती ?

या दणकट  सुव्हची  सुरुवातीची किंमत २.५९ कोटी रुपये ( एक्स-शोरूम ) निश्चित केली आहे. याशिवाय, ग्राहक डिफेंडर ऑक्टा एडिशन वन देखील खरेदी करू शकतात, जी केवळ उत्पादनाच्या पहिल्या वर्षासाठी उपलब्ध असेल आणि तिची किंमत २.७९ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.