Car Sale : देशात सर्वाधिक सेल झाल्या ‘या’ टॉप 5 कार, जूनमध्ये झाली तुफान विक्री
पेट्रोल व डिझेल सेगमेंटमधील गेल्या महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. जून महिन्यामध्ये मारुतीच्या वेगनआर, बलेना व स्वीफ्ट, टाटाची नेक्सॉन तर ह्युंदाईच्या क्रेटाने चांगली कामगिरी केली आहे.
भारतात जूनमध्ये विक्री झालेल्या कार्सची यादी प्रसिध्द झाली आहे. यातून सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 कारची (Top 5 cars) माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वात जास्त विक्री मारुती सुझुकीच्या वेगनआर कारची झाली आहे. मारुतीची ही कार गेल्या चार महिन्यांपासून 1 नंबरवर राहिली आहे. मारुती ही देशातील सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी आहे. मारुतीच्या वेगनआर (WagonR), बलेनो, स्वीफ्ट त्याच प्रमाणे टाटाची नेक्सॉन, ह्युंदाईची क्रेटा आदी गाड्यांनादेखील गेल्या महिन्यात चांगली मागणी राहिली होती. सध्या इंधनाचे दर पाहता इलेक्ट्रिक सेगमेंटच्या (Electric segment) गाड्यांना अधिक मागणी वाढली आहे. परंतु असे असले तरीही मारुती, टाटा तसेच ह्युंदाईच्या काही लोकप्रिय गाड्यांनी ग्राहकांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवली आहे.
- मारुती सुझुकीची वेगनआर एक चांगला मायलेज देणारी कार आहे. गेल्या महिन्यातील माहितीनुसार, ही एक बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. गेल्या महिन्यात 19190 कार युनिट्सची विक्री झालेली आहे. मारुती सुझुकीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही कार 24.35 किमी प्रतिलीटरचा मायलेज देत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर 1 किलोग्राम सीएनजीवर ही कार तब्बल 34.5 किमीपर्यंतची रेंज मिळवते.
- मारुती सुझुकीची स्वीफ्ट जूनच्या विक्रीमध्ये दुसर्या क्रमांकावर राहिली आहे. ही एक हॅचबॅक सेगमेंटची कार आहे. या कारची एक्सशोरुम किंमत 5.91 लाख रुपये आहे. ही कार 3.7 किलोमीटर प्रतिलीटरपर्यंचा मायलेज देउ शकते. सोबतच यात, 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. ही एक 5 सीटर कार आहे.
- मारुती सुझुकी बलेनोची जूनमध्ये चांगली विक्री झाली. कंपनीने नुकतेच या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. यात कंपनीने हेडअप डिसप्लेसह विविध फीचर्सदेखील दिले आहेत. यात 22.94 किलोमीटर प्रतिलीटरचा मायलेज मिळू शकतो. या कारमध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच 5 सीटर कपॅसिटी असून यात 318 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.
- टाटा नेक्सॉनची 7.55 लाख रुपये सुरुवातीची एक्सशोरुम किंमत आहे. तसेच या कारच्या टॉप व्हेरिएंटची एक्सशोरुम किंमत 13.90 लाख रुपये इतकी आहे. ही कार 22 किलोमीटर प्रतिलीटरचा मायलेज देउ शकते. सोबतच यात, 1497 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. ही 5 सीटर कार आहे. यात मॅन्यूअल आणि ऑटोमेटीक गिअरबाक्स पर्याय उपलब्ध आहेत.
- ह्युंदाई क्रेटाची जूनमध्ये 13790 युनिट्सची विक्री झाली. या कारची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 10.44 लाख रुपये आहे. यात 1497 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. सोबत यात 138 बीएचपीची पॉवर आणि मॅन्यूअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.