इलेक्ट्रीक कार टाटा किंवा महिंद्र कोणीही विकू द्या, फायदा मात्र चीन कमावतोय…का?

| Updated on: Dec 16, 2024 | 5:05 PM

भारतात इलेक्ट्रीक कारची विक्रीत सतत वाढ होते आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्र एंड महिंद्र या सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा आहे. तर मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रीक कारच्या स्पर्धेत उतरत आहे. परंतू इलेक्ट्रीक कार भारतीय कंपन्यांनी विकली तरी फायदा मात्र चीनचा होत आहे.

इलेक्ट्रीक कार टाटा किंवा महिंद्र कोणीही विकू द्या, फायदा मात्र चीन कमावतोय...का?
Follow us on

भारतात इलेक्ट्रीक कारची विक्री वाढत आहे. या इलेक्ट्रीक कार विक्रीत टाटा मोटर्स सर्वात पुढे आहे. तर महिंद्र एंड महिंद्र यात लवकरच मोठी योजना आखत आहे. तसेच मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रीक कार सेक्टर्समध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. परंतू या भारतीय कंपन्यांनी किती इलेक्ट्रीक कार विकल्या तरी फायदा मात्र चीनला होत आहे. काय आहे या मागचे कारण पाहूयात…

टाटा, महिंद्र आणि मारुती याशिवाय देशात MG Motor India आणि BYD India अशा टॉप – फाईव्ह कंपन्या इलेक्ट्रीक कार विक्रीत पुढे आहेत. परंतू या दोन कंपन्या चीनी आहेत. परंतू टाटा, महिंद्र आणि मारुती कंपनीच्या इलेक्ट्रीक कारच्या विक्रीतून चीनचा काय फायदा होत आहे. या कारच्या विक्रीतून चीनला फायदा होण्याचे काय कारण आहे पाहूयात…

कोणत्याही इलेक्ट्रीक कारच्या निर्मितीत एक तृतीयांश खर्च केवळ बॅटरीवर होत असतो. कारची बॅटरी हीच इलेक्ट्रीक कारची खरी ताकद असतो. बॅटरी शिवाय इलेक्ट्रीक कार एक डब्बा आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांच्या इलेक्ट्रीक कारची बॅटरी वेग-वेगळ्या मॅन्युफॅक्चर्स कडून विकत घेत आहे. तसेच स्वत:चा बॅटरी निर्मिती करण्याचा विचारही करीत आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा मोटर्सने त्यांच्या Curvv EV कारसाठी चीनची एक कंपनी ऑक्टीलियन पॉवर सिस्टीमकडून बॅटरी पॅक विकत घेत आहे. तसेच य़ा बॅटरीसाठी लागणारे सेल्स देखील चीनी कंपनी EVE बनवित आहे. या शिवाय टाटा मोटर्स चीनच्या लिथीयम आयर्न सेल तयार करणारी कंपनी Gotion या कंपनीकडून देखील बॅटरीचे सेल विकत घेत आहे.

महिंद्र एंड महिंद्र घेतोय BYD ची मदत

महिंद्र एंड महिंद्र अलिकडेच BE 6 आणि XEV 9e सारख्या बॉर्न इलेक्ट्रीक कार बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही कारच्या फिचर्सने मार्केटमध्ये धूम माजविली आहे. याच प्रकारे मारुती सुझुकी कंपनीने देखील नुकतेच eVitara कार बाजारात आणण्याची योजना केली आहे. या दोन्ही कारमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. या दोन्ही कारमध्ये BYD च्या Blade Battery Technology च्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. महिंद्र आणि मारुती त्यांच्या इलेक्ट्रीक कारसाठी चीनच्या ऑटोमोबाईल कंपनी बीवायडीकडून ब्लेड बॅटरी पॅक आयात करीत आहे. ब्लेड बॅटरी टेक्नॉलॉजी आधुनिक असून यात सिलेंडर सेल ऐवजी सेल्सला लांब ब्लेड्ससारखे डिझाईन केलेले आहे. त्यामुळे सेल खराब होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि ती वेगाने चार्जिंग होते.