सर्वात वाईट आणि चांगले ड्रायव्हर असलेल्या देशांची यादी, भारतात आघाडीचं शहर कोणतं?

जगात सर्वात वाईट ड्रायव्हर या देशात, भारतात या शहरात वाईट ड्रायव्हर, मुंबईचं स्थान कितवं? यादीच पाहा, चांगले वाईट ड्रायव्हरमध्ये देश आणि शहरांची यादी लावताना कोणते निकष लावले आहेत, आणि ही यादी का बनवण्यात आली आहे, हे देखील रंजक असलं तरी विषय मात्र गंभीरच, पाहा

सर्वात वाईट आणि चांगले ड्रायव्हर असलेल्या देशांची यादी, भारतात आघाडीचं शहर कोणतं?
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 5:59 PM

मुंबई : भारतामध्ये आता कुठे चांगले रस्ते होताना दिसत आहेत. चार पदरी एक्सप्रेस वे आणि त्याच्यासोबतच सर्व्हिस रोडही तयार केले जात आहेत. रस्ते विकास खातं देशामध्ये आता आणखी नवीन रोड करण्यासाठी योजना आखत आहेत. मात्र याआधी भारतात रस्त्यांचा विकास म्हणावा असा झाला नव्हता. मात्र आता जरी मोठमोठे रोड बनत असले तरी अपघातांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? जगात सर्वात वाईट चालक कोणत्या देशात आहेत? यामध्ये भारताचा कितवा नंबर आहे. एका इन्शुरन्स कंपनीने एक सर्व्हे केला आहे, त्यामध्ये त्यांनी जगातील सर्वात वाईट चालक असणाऱ्या देशाबद्दल माहिती दिली आहे.

इन्शुरन्स कंपनीने हा अभ्यास करताना, वाहतूक जागरुकता, रस्ते वाहतूकी दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि इतर समस्या विचारात घेतल्या आहेत. इतकंच नाहीतर चालकांच्या रक्तातील अल्कहोलचे प्रमाण, रस्त्यांची अवस्था, सोशल मीडियावर सरकारकडून रस्त्यांबाबत देण्यात आलेली माहिती आणि देशामध्ये वर्षात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येवरून हा सर्वे करण्यात आला आहे.

अभ्यासानुसार एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये जगातील सर्वात सुरक्षित चालक असणारा देश हा जपान असल्याचं सांगितलं गेलं आहे. वरील सर्व गोष्टी लक्षात घेत जपानचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरक्षित चालकच नाहीतर पादचाऱ्यांसाठीही जपान देश फार सुरक्षित आहे. सर्वात सुरक्षित चालक असलेल्या देशामध्ये  10 युरोपीय देशांचा समावेश आहे.

याच यादीनुसार थायलंडमध्ये सर्वात वाईट चालक आहेत. थायलंडमध्ये जगातील सर्वात वाईट वाहतूक परिस्थिती आहे. सर्वात वाईट चालकांच्या यादीत पेरू देशाचा दुसरा तर लेबनॉनचा तिसरा क्रमांक आहे. भारत चौथ्या क्रमांकावर आहे. जपानच्या तुलनेत भारताला ४.५७ गुणांच्या तुलनेत केवळ २.३४ गुण मिळाले आहेत.

दरम्यान, भारतात सर्वाधिक अपघात होणाऱ्या शहरांमध्ये नवी दिल्ली अग्रस्थानी आहे. त्यानंतर मुंबई, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद या शहराचा क्रमांक लागतो. नवी दिल्ली अपघाताचं प्रमाण 20.3 टक्के, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून अपघाताचं प्रमाण 18.8 टक्के आहे. दुसरीकडे, बंगळुरुत सर्वाधिक ट्राफिक होतं. बंगळुरू हे वाहतुकीच्या यादीत सर्वात धीमं शहर आहे. या शहरात 10 किमीसाठी अर्धा तास मोजावा लागतो. कर्नाटकातील बंगळुरु या शहराच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर लंडन पहिल्या क्रमांकावर तर बंगळुरू दुसऱ्या क्रमांकाचं वाहतूक कोंडी असलेलं शहर आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....