Madhuri Dixit Range Rover : ‘धकधक गर्ल’ने खरेदी केली रेंज रोव्हर सुपर लक्झरी SUV, किंमत आहे इतकी

माधुरी दीक्षित आणि तिचा पती डॉक्टर श्रीराम नेने याच्याकडे आलिशान कारचा ताफा आहे. नुकतीच त्यांच्या गॅरेजमध्ये एक नवीन कार दाखल झाली आहे. Range Rover Autobiography LWB 3.0 व्हेरिएंट दाखल झाले आहे. काय आहेत फीचर, किती आहे किंमत?

Madhuri Dixit Range Rover : 'धकधक गर्ल'ने खरेदी केली रेंज रोव्हर सुपर लक्झरी SUV, किंमत आहे इतकी
इतकी आहे कारची किंमत
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 3:27 PM

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने नुकतीच नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली. जुहूमध्ये या नवीन कारसह ती दिसली. त्यावेळी तिचा पती डॉ. श्रीराम नेने हा सुद्धा सोबत होता. ही आलिशान आणि महागडी कार आहे. रेंज रोव्हरच्या या एसयुव्हीची किंमत 4 कोटींच्या घरात आहे. या SUV चे हे ऑटोबायोग्राफी LWB 3.0 डिझेल व्हेरिएंट आहे. या SUV चा VIP रजिस्ट्रेशन क्रमांक ‘0006’ असा आहे.

कोणते मॉडल केले खरेदी

Range Rover Autobiography LWB 3.0 च्या डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 3.16 कोटी रुपये आहे. याशिवाय ऑन-रोड किंमत जवळपास 3.79 कोटी रुपये आहे. तर खास रंगासाठी काही शिल्लक शुल्क आकारण्यात येतो. सर्व मिळून या कारची किंमत 4 कोटी रुपयांच्या घरात जाते. रेंज रोव्हर मॉडेलला सध्या सर्वाधिक मागणी आहे. बॉलिवुडचे स्टार ही कार खरेदी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Range Rover Autobiography LWB 3.0 चे इंजिन

या SUV मध्ये 6-सिलेंडर ट्विन टर्बोचार्ज्ड मोटर देण्यात आली आहे. यामध्ये 346bhp ची पॉवर आणि 700Nm चा टॉर्क जनरेट होते. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टमसह येते.

Range Rover Autobiography LWB 3.0 चे फीचर्स

या मॉडेलमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये LED हेडलाईट्स, सिग्नेचर DRL (डे रनिंग लाईट्स) 22-इंचाची डायमंड कट अलॉय व्हील्स, फ्लॅश टाईप डोअर हँडल्स, LED फॉग लाईट्स, हीटेड विंडस्क्रीन यांचा समावेश आहे. यामध्ये कारवे परफॉर्म्ड लेदर सीट्स, 24-वे ॲडजस्टेबल इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स, लेदर स्टीअरिंग व्हील कव्हर, एक्झिक्युटिव्ह रिअर सीट्स आणि इतर अनेक फीचर्स आहेत.

माधुरीकडे अनेक आलिशान कार

माधुरी दीक्षित हिच्याकडे अनेक लक्झरियस कारचा ताफा आहे. यामध्ये Mercedes Maybach S560 हे सेडान कार, जिची किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 4-लिटर V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 453bhp ची पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करते. यासह 9-स्पीड गियरबॉक्स आणि रिअर व्हील ड्राईव्ह सिस्टम मिळते. याशिवाय माधुरीकडे जुनी रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंज जीएलएस एसयुव्ही पण आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.