Tata Nexon ला टक्कर, Mahindra ची इलेक्ट्रिक कार सज्ज, सिंगल चार्जवर 375km धावणार
2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Mahindra Electric car will launch in 2021 in India)

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. (Mahindra Electric car will launch in 2021 in India)
भारतात इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्यासाठी Mahindra & Mahindra कंपनी सज्ज आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार Mahindra कंपनीने इलेक्ट्रिक कार्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. कंपनी यंदा Mahindra EKUV100 ही कार लाँच करु शकते. या कारची किंमत 8.25 लाख रुपये इतकी असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान आता माहिती मिळाली आहे की, महिंद्रा कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 चं इलेक्ट्रिक कार व्हेरिएंट लाँच करणार आहे. (Mahindra eXUV300 SUV will give tough competition to TATA Nexon electric know more about it)
महिंद्रा आणि महिंद्राने मागील वर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 सादर केली होती. आता ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. लॉन्चनंतर ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या आणि स्वस्त एसयूव्ही टाटा नेक्सॉनशी स्पर्धा करेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार महिंद्राची ही एसयूव्ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 375 किमीपर्यंतची रेंज देईल. कंपनी या कारचे दोन प्रकार बाजारात आणणार आहे, ज्यात स्टँडर्ड रेंज आणि लाँच रेंज एसयूव्हीचा समावेश आहे. यामध्ये, आपल्याला स्टँडर्ड रेंज एसयूव्हीध्ये 200 किमी रेंज मिळेल आणि लाँग रेंज कारमध्ये 375 किमी इतकी रेंज मिळेल. म्हणजेच ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 375 किलोमीटरपर्यंत चालेल.
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक या कारबद्दल बोलायचे झाले तर या एसयूव्हीची रेंज 312 किमी इतकी आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 312 किलोमीटपर्यंत धावते. अशा परिस्थितीत महिंद्रा एक्सयूव्ही 300 इलेक्ट्रिक ही कार नेक्सॉनवर भारी पडू शकते, असा दावा केला जात आहे. ARAI द्वारे Mahindra eXUV300 या कारचं अद्याप टेस्टिंग बाकी आहे. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर ही कार लाँच केली जाऊ शकते. दरम्यान कंपनीला या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल पूर्ण विश्वास आहे.
जागतिक बाजारात जाणारी पहिली इलेक्ट्रिक SUV
कंपनीने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV300 MESMA 350 (Mahindra Electric Scalable and Modular Architecture 350) वर विकसित केली आहे. ही भारताची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल जी युरोपियन आणि इतर जागतिक बाजारात विक्रीसाठी पाठविली जाईल. महिंद्रा eXUV300 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या कारची किंमत 15 लाख ते 18 लाखांदरम्यान ठेवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
EXUV300 च्या डिझाईनमध्ये काय असेल खास?
ही एसयूव्ही 40kWh (स्टँडर्ड) आणि 60kWh (लाँग रेंज) बॅटरी पर्यायांसह लाँच केली जाईल. महिंद्रा eXUV300 ला सध्या उपलब्ध असलेल्या XUV300 या मॉडेलचे डिझाइन मिळेल. तथापि, या कारच्या फ्रंटला ग्रिल, स्पेशल एलईडी हेडलाइट्ससह ब्लू एलईडी ग्राफिक्स, नवीन बंपर इत्यादी जोडल्या जातील. याशिवाय इंटीरियरमध्ये नवीन पॉप-आउट स्टाईल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन सीट अपहोल्स्ट्री, वायरलेस चार्जर, नवीन स्टीयरिंग व्हील देण्यात येईल.
‘इंडियन कार ऑफ द ईयर’ पुरस्काराचा मान Hyundai च्या ‘या’ गाडीला, इलेक्ट्रिक कार्समध्ये Tata ची बाजी#CarOfTheYear #Hyundai #Tata #Mahindra https://t.co/jXULHFspz2
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
इतर बातम्या
2 महिन्यात 5 जबरदस्त गाड्या भारतात लाँच, जाणून घ्या कोणती कार आहे तुमच्यासाठी परफेक्ट
‘इंडियन कार ऑफ द ईयर’ पुरस्काराचा मान Hyundai च्या ‘या’ गाडीला, इलेक्ट्रिक कार्समध्ये Tata ची बाजी
(Mahindra eXUV300 SUV will give tough competition to TATA Nexon electric know more about it)