Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश

महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल

Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश
Mahindra New Car Launch - Scorpio, Thar, Bolero
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 11:07 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) अखेर पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार आहे. वित्तीय वर्ष 2021 साठी कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यासाठी कंपनीने ऑनलाईन मीडिया ब्रीफिंगचं आयोजन केलं होतं. दरम्यान, महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल. (5 door Mahindra Thar Launching confirmed, know details)

5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.

Mahindra Bolero मध्ये काय असेल खास?

दमदार इंजिन

आपण यामधील आणखी काही डिझाईन्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन बोलेरो हेडलॅम्प्स, फॉग लाईट्स आणि बॉडी कलर ORVM’s मध्ये बदल केले जातील. अंडर द हुड नवीन महिंद्रा बोलेरो बीएस 6 कंप्लाएंट 1.5 लीटर, तीन सिलेंडर, mHawk डिझेल इंजिनसह येईल. यात 75bhp मॅक्झिमम पॉवर आणि पीक टॉर्क 210Nm इतकं असेल. त्याचबरोबर यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील दिले जाईल.

बाजारात वर्चस्व

बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी चारचाकी गाडी आहे. तथापि, सध्या देशात बोलेरोशी स्पर्धा करु शकेल अशी दुसऱ्या कोणत्याही कंपनीची कार उपलब्ध नाही. त्यातल्या त्यात मारुती अर्टिंगा (Maruti Suzuki Ertiga) आणि रेनो ट्रायबर (Renault Triber) या दोन कार या विभागात मोडतात. परंतु त्यांची थेट बोलेरोशी स्पर्धा नाही.

नव्या बोलेरोची किंमत किती?

बोलेरोची किंमत 8.40 लाख ते 9.39 लाख रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत नवीन मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते, जी 8.50 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. 2021 मध्ये महिंद्रा अनेक उत्तम वाहनं लाँच करण्याचा सपाटा लावणार आहे. नवीन बोलेरो व्यतिरिक्त, या यादीत XUV700 समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, ग्राहक न्यू जनरेशन स्कॉर्पिओ, बोलेरो निओ आणि बर्‍याच इलेक्ट्रिक कार देखील लाँच करु शकते. तथापि, अद्याप या वाहनांचे पदार्पण कधी होणार याबाबतची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

कशी असेल Mahindra XUV700?

पूर्णपणे नवं डिझाईन

महिंद्रा एक्सयूव्ही 700 (XUV700) पूर्णपणे नवीन स्टाईलसह सादर केली जाईल. तरी यामधील काही गोष्टी एक्सयूव्ही 500 (XUV500) सारख्याच असतील. या कारमध्ये एक नवीन ग्रिल, युनिक LED DRLs सह नवीन सी-शेप्ड हेडलाइट, नवीन टेललाईट, नवीन अलॉय व्हील डिझाईन आणि रिस्टाइल्ड बोनेट, बंपर्स आणि टेलगेट मिळेल. तसेच या कारच्या डोर हँडल्समध्येदेखील बदल केले जाणार आहेत. या कारमध्ये फ्लश माउंटेड लीवर्स मिळतील ज्यामुळे या कारला मॉडर्न लुक मिळतो.

शानदार फीचर्सने सुसज्ज

आपल्या कारला तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंती मिळावी, यासाठी कंपनी त्यात अनेक कमालीचे फीचर्स देत आहे. ज्यामध्ये ड्युअल स्क्रीन लेआउट उपलब्ध असेल, ज्यामध्ये एक इन्फोटेन्मेंट आणि दुसरी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी. असे फीचर्स मर्सिडीजच्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. यासह, यात अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड (ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी), वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स आणि पॅनारोमिक सनरूफसारखे फीचर्स मिळतील. ही कार 6 आणि 7 सीट्सच्या दोन लेआउटमध्ये सादर केली जाईल.

या कारच्या सेफ्टी फीचर्सवषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये हाय ट्रिम्समध्ये लेव्हल 2 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम (ADAS) मिळेल. ही सिस्टम या कारच्या टॉप ट्रिम्समध्ये मिळेल. या सेगमेंटमधील कारमध्ये हे फीचर मिळण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. तसेच ADAS मुळे तुम्हाला अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीपिंग असिस्ट असे फीचर्स मिळतील.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

महिंद्राने न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल.

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

प्रतीक्षा संपली! ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच होणार Mahindra XUV700, कशी असेल नवी SUV?

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...