Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra : महिंद्राच्या नवीन स्कॉर्पियोचा सस्पेंस संपणार… आज होणार लाँच, किंमतीबाबत उत्सूकता कायम

सर्वाधिक जास्त लोकप्रिय ठरलेल्या महिंद्राच्या स्कॉर्पियोचा नवीन अवतार आज सर्वांसमोर येणार आहे. नवीन डिझाईन आणि फीचर्ससह नवीन स्कॉर्पियोला कंपनी आज लाँच करणार आहे. नवीन फ्रंट लूकसह क्रोम फिनिश आणि अत्यंत आकर्षक कलरसह ही अपकमिंग कार आज ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.

Mahindra : महिंद्राच्या नवीन स्कॉर्पियोचा सस्पेंस संपणार... आज होणार लाँच, किंमतीबाबत उत्सूकता कायम
महिंद्रा स्कॉर्पियोImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 6:03 PM

मुंबई : अनेकांसाठी स्टेटस सिंबॉल असलेली महिंद्रा स्कॉर्पियोच्या (Mahindra Scorpio) नवीन अवतारावरुन आज अखेर परदा उठणार आहे. या अपकमिंग कारबाबत ग्राहकांमध्ये अनेक दिवसांपासूनची उत्सूकता आज संपणार आहे. कंपनी आज आपली नवीन स्कॉर्पियो लाँच करणार आहे. परंतु अद्याप कंपनीकडून नवीन कारच्या किंमतीबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कारची किंमत नेमकी कितीने वाढणार, याची युजर्समध्ये उत्सूकता कायम आहे. नवीन डिझाईन आणि फीचर्ससह (Features) नवीन स्कार्पियो आज लाँच करण्यात येणार आहे. नवीन फ्रंट लूकसह क्रोम फिनिश आणि आकर्षक रंगामुळे नवीन स्कॉर्पियो अधिक आकर्षक ठरणार आहे. कंपनीने या नवीन स्कॉर्पियोला स्कॉर्पियो एन (Scorpio N) हे नाव दिले आहे. एका रिपोर्टनुसार, स्कॉर्पियोच्या या नवीन मॉडेलची किंमतदेखील आज जाहिर होणार आहे. या कारमध्ये असलेले सर्व फीचर्स आता समोर आले आहेत. इंटीरियरपासून ते एक्सटीरियरपर्यंत कारबाबत प्रत्येक लहान मोठी गोष्ट ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

अनेक व्हेरिएंटमध्ये होणार लाँच

महिंद्राने ब्रँडिंगसाठी आपल्या या नवीन स्कॉर्पियोला बिग डॅडी ऑफ एसयुव्हीचे नाव दिले आहे. कंपनी याला पाच विविध ट्रिम्समध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. ही नवीन स्कार्पियो Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. हे ट्रिम्स या कारचे वेगवेगळे मॉडेल्स असणार आहेत. प्रत्येक मॉडेलमध्ये आपआपले फीचर्स उपलब्ध असणार आहेत.

कोणत्या कार्सशी असेल स्पर्धा

भारतामध्ये एसयुव्ही कारची रेंज वेळेनुसार बरीच मोठी झाली आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहता कंपन्यादेखील सातंत्याने नवीन एसयुव्ही बाजारात आणत आहेत. याच क्रमाने महिंद्राने देखील आपली या कारला बाजारात दाखल केले आहे. या नवीन स्कॉर्पियोची पहिली टक्कर ह्युंडाईच्या क्रेटा, टाटाच्या सफारी आणि हेरियर आणि ह्युंदाई अल्कझारशी होणार आहे. मिड रेंज एसयुव्हीच्या पर्यायांमध्ये ही कार अन्य कार्सची चांगली स्पर्धा करणार आहे.

हे सुद्धा वाचा

XUV700 चा फील मिळणार

कंपनीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन स्कॉर्पियोमध्ये आत तसेच बाहेरदेखील अनेक बदल केले आहेत. कारच्या सीट कव्हरपासून ते पूर्ण इंटीरियर आणि बाहेरच्या ग्रीलपासून ते पूर्ण बोनटपर्यंत डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहेत. ही कार दिसायला काहीशी XUV700 चा फील देउ शकते. स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीतही इंजिनमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत.

धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.