Mahindra Scorpio N : नवीन स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी या तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स….
कंपनी या वर्षी स्कॉर्पिओच्या 20 हजार युनिट्सचे उत्पादन करेल. महिंद्राची स्कॉर्पिओ SUV सेगमेंटमध्ये 22 वर्षांपासून आपला ठसा उमटवत आहे. कंपनीने या नवीन स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये ठेवली आहे.
मुंबई : श्री गणरायाच्या आगमनला थोडेच दिवस बाकी आहेत. सण-उत्सव असले की वाहनांची खरेदी देखील वाढते. सण- उत्सवादरम्यान असलेल्या शुभ मुहूर्ताला घरात नवीन वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, वाहन घेताना त्याची संपूर्ण माहिती असावी. अगदी किमतीपासून ते फीचर्सपर्यंत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नव्या कारविषयी सांगणार आहोत. महिद्रानं स्कॉर्पिओ एंन (Scorpio N) चं बुकिंग (Booking) 30 जुलै पासून सुरु होत आहे. अशी अपेक्षा आहे की 26 सप्टेंबरपासून महिंद्रा आपल्या नवीन स्कॉर्पिओची (Scorpio) डिलिव्हरी देखील सुरू करेल. कंपनीची योजना आहे की ती यावर्षी स्कॉर्पिओच्या 20 हजार युनिट्सचे उत्पादन करेल. महिंद्राची स्कॉर्पिओ SUV सेगमेंटमध्ये 22 वर्षांपासून आपला ठसा उमटवत आहे. कंपनीने या नवीन स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने ही किंमत फक्त सुरुवातीच्या 25 हजार वाहनांसाठी ठेवली आहे.
पाहा व्हिडीओ
Give your senses an overload of newness. The All-New Scorpio-N, new from every angle.
हे सुद्धा वाचाBook a Test Drive now!
Know More: https://t.co/kCtQscBC4l pic.twitter.com/XNMjKSRiyB
— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) July 19, 2022
काय स्पेशल आहे?
महिंद्राने आपली नवीन Scorpio N दोन इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. 2.0 लिटर पेट्रोल इंजिन 200bhp आणि 370Nm पॉवर जनरेट करते. या नवीन स्कॉर्पिओमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. दुसरे इंजिन 2.2L डिझेल इंजिन 130bhp आणि 370Nm पॉवर जनरेट करते. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओची पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागणी केली आहे.
आकर्षक रंग
Spoilt for choice? Only with the All-New Scorpio-N. Prices and booking process announced.
Know more: https://t.co/rChoYf4keg *Ex-Showroom launch price applicable for the first 25,000 bookings. pic.twitter.com/bgKiCiCl2s
— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) June 29, 2022
Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L अशी या प्रकारांची नावे आहेत. रश लेन या ऑटो वेबसाइटनुसार, नवीन स्कॉर्पिओची डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून ग्राहकांना मिळणे सुरू होईल.
किंमत किती?
काल महिंद्राने Scorpio च्या सर्व ऑटोमॅटिक N प्रकारांच्या किमती जाहीर केल्या आहेत. मॅन्युअल व्हेरियंटच्या तुलनेत ऑटोमॅटिकच्या जवळपास सर्व व्हेरियंटच्या किमती सुमारे 2 लाख रुपयांनी वाढल्या आहेत. मॅन्युअलच्या तुलनेत, ऑटोमॅटिकमध्ये आणखी काही नवीन वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. ऑटोमॅटिक स्कॉर्पिओ N च्या बेस व्हेरिएंट Z4 ची एक्स-शोरूम किंमत 15.45 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये कंपनीने ईएससी विथ ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, व्हेईकल डायनॅमिक्स कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल यांसारखी अधिक वैशिष्ट्ये दिली आहेत.
हे देखील जाणून घ्या…
स्कॉर्पिओच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, कंपनी त्यामध्ये AI आधारित 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देत आहे. कार टेक, इलेक्ट्रिक सनरूफ, 7 इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 3D सोनी साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि बरेच काही कनेक्ट करा.