Video : Mahindra Scorpio N गाडीचं सनरुफ लीक! ‘त्या’ कथित व्हिडीओनंतर कंपनीने उत्तर देत तोंडं केली बंद

महिंद्रा स्कॉर्पियो एनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. यामुळे गाडीच्या सनरुफबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत. अखेर कंपनीने डेमो देत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Video : Mahindra Scorpio N गाडीचं सनरुफ लीक! 'त्या' कथित व्हिडीओनंतर कंपनीने उत्तर देत तोंडं केली बंद
महिंद्रा कंपनीचं जशाच तसं उत्तर, Mahindra Scorpio N गाडीच्या 'त्या' कथित व्हिडीओनंतर स्वत:च दिला डेमो Watch VideoImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 1:23 PM

मुंबई : महिंद्र अँड महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेली स्कॉर्पियो एन एसयुव्ही ही गाडी सध्या चर्चेत आहे. गाडीसाठी वेटिंग पिरियड दोन वर्षांचा असून लोकप्रियता लक्षात येते. मात्र असं असताना एका कथित युट्यूब व्हिडीओमुळे गाडीची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत स्कॉर्पियो एनच्या सनरूफमधून पाणी गळती होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडीओत एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ एन धबधब्याखाली उभी असल्याचं दिसत आहे. तसेच गाडीत पाणी लिकेज होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुढे येत एक डेमो दिला आहे आणि टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.

सध्याच्या मॉडर्न गाड्यांमध्ये सनरुफ पाहायला मिळते. ग्राहकही सनरुफ गाड्यांना पसंती आहेत. महिंद्रा कंपनीने एक व्हिडीओ रिलीज केला आहे. त्यात स्कॉर्पियो एन धबधब्याखाली उभी केल्याचं दिसत आहे. त्या गाडीवर धबधब्याचं पाणी पडत आहे. मात्र त्या सनरुफमधून काहीच होत नाही. व्हिडीओसोबत कंपनीने लिहिलं आहे की, “ऑल न्यू स्कॉर्पियो-एनच्या आयुष्यातील आणखी एक दिवस.” तसेच व्हिडीओच्या शेवटी लिहिलं आहे की, हे प्रोफोशनल्सच्या देखरेखीखाली केलं गेलं आहे, तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न करू नका.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत स्कॉर्पिओ एका धबधब्याखाली उभी केली आहे. या 52 सेकंदाच्या व्हिडीओत सदर व्यक्ती गाडी धबधब्याखाली धुण्याचा प्रयत्न करत आहे. सनरुफ बंद असूनही पाणी आत येतं. एसी वेंट्समधून पाणी गळती सुरु होते. तसेच व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, आता यापुढे कधीही सनरुपवाली गाडी घेणार नाही. दुसरीकडे, व्हायरल व्हिडीओनंतर कंपनीने शंका उपस्थिती केली आहे की, एसयुव्हीचं सनरुफ धबधब्याखाली नेण्यापूर्वी व्यवस्थितरित्या लावलं नसेल. त्याचबरोबर कंपनीची छबी करण्यासाठी असं पाऊल उचललं तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

महिंद्रा स्कॉर्पियोचं टॉप व्हेरियंट असलेलं मॉडेल सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरुफसह येते. महिंद्रा कंपनीने आपल्या स्कॉर्पियो एनच्या Z6, Z8 आणि Z8L व्हेरियंटमध्ये हे फीचर दिलं आहे. या गाडीची किंमत 15.64 लाखांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते आणि 24.05 लाख (एक्स-शोरुम) रुपयांपर्यंत जाते. या एसयुव्हीत 8 इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, एक वायरलेस फोन चार्जर, 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.