या कारचा बाजारात ‘थार’ थराट; प्रत्येक सेकंदाला 47 Car चे झाले बुकिंग

Mahindra Thar Roxx : तरुणाईच नाही तर अनेकांना महिंद्रा थार रॉक्सने भुरळ घातली आहे. या कारच्या लोक प्रेमात पडले आहेत. या कारच्या 5 डोअर व्हर्जनची बाजारात क्रेझ आहे. या कारची बुकिंग सुरू झाल्यानंतर कंपनीला केवळ एकाच तासात जबरदस्त बुकिंग मिळाली.

या कारचा बाजारात 'थार' थराट; प्रत्येक सेकंदाला 47 Car चे झाले बुकिंग
महिंद्रा थार वर ग्राहकांच्या उड्या
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 4:09 PM

महिंद्रा कंपनीच्या कारची ग्राहकांमध्ये एकदम क्रेझ आहे. रफ अँड टफ मॉडलच्या ग्राहक प्रेमात आहेत. सर्वात जास्त तर Mahindra Thar ची क्रेझ आहे. 3 डोअर महिंद्रा थार बाजारात उतरवल्यानंतर कंपनीने ही कार आता 5 डोअर व्हर्जनमध्ये आणली आहे. Mahindra Thar Roxx पण बाजारात लाँच करण्यात आली आहे. कंपनीच्या रॉक्सची बुकिंग सुरू झाली आहे. या कारच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. या कारच्या बुकिंगला सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे. बुकिंगचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड या कारने मोडीत काढले आहेत.

बुकिंगसाठी ग्राहकांच्या उड्या

3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नवीन Thar चे Booking सुरू झाले. कंपनीला केवळ 60 मिनिटांमध्ये 1 लाख 76 हजार 218 बुकिंग मिळाली. एका सेकंदाला या एसयुव्हीला 47 बुकिंग मिळाले. आकड्यांवर नजर टाकली असता ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. महिंद्रा समूहाचे आणि महिंद्रा अँड महिद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण म्हणावं लागेल. कारण या 5 डोअर थार रॉक्सवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Mahindra Thar Roxx Booking Amount

महिंद्रा कंपनीची थार रॉक्स बुकिंग करायची असेल तर तुम्हाला सुरूवातीला 21 हजार रुपयांची बुकिंग रक्कम द्यावी लागेल. बुकिंग सुरू होताच कंपनीने या कारची वाहन चाचणी पण सुरू केली आहे.

Mahindra Thar Roxx Delivery

महिंद्रा नुसार या नवीन 5 डोअर थार रॉक्स कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. ही नवीन कार येत्या दसऱ्यापासून वितरण होईल. या SUV च्या एकूण 6 व्हेरिएंट्स आहेत. MX1, MX5, MX3, AX5L, AX3L आणि AX7L अशी व्हेरिएंट्स आहेत. ही सर्व मॉडल्स पेट्रोल, डिझेल आणि 4WD व्हेरिएंट्समध्ये मिळेल. या कारमध्ये नवीन थार रॉक्समध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे दोन्ही इंजिनाच पर्याय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहेत.

Mahindra Thar Roxx Price in India

महिंद्रा थारच्या या 5 डोअर मॉडलची किंमत 12 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तर या कारचे टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 22 लाख 49 हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.