Mahindra : महिंद्राच्या एक-दोन नव्हे तब्बल तीन इलेक्ट्रिक कारचे होणार लाँचिंग… कंपनीचे टीझर पाहिलेत का?

महिंद्राचे पूर्ण लक्ष आपल्या एसयुव्ही इलेक्ट्रिक कारकडे असल्याचे बोलले जात आहेत. महिंद्रा आपल्या ईव्ही कॉन्सेप्टला बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजनच्या नावाने सादर करु शकते.

Mahindra : महिंद्राच्या एक-दोन नव्हे तब्बल तीन इलेक्ट्रिक कारचे होणार लाँचिंग... कंपनीचे टीझर पाहिलेत का?
बॉर्न इलेक्ट्रिकच्या नावाने येईल ई-कारImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 9:01 AM

मुंबई : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) वाढती मागणी पाहता महिंद्रा कामाला लागली आहे. कंपनीने ईव्ही बाजारात उतरण्यासाठी शंख फूंकला आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक कार जुलैमध्ये बाजारात धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने ट्‌विटरवर एक टीझर (teaser) रिलीज केला आहे. ज्यात तीन कार दिसून येत आहेत. टीझरमध्ये दिसणार्या तिन्ही कार एसयुव्ही आहेत. यामुळेच महिंद्राचे पूर्ण लक्ष आपल्या एसयुव्ही इलेक्ट्रिक कारकडे असल्याचे बोलले जात आहेत. महिंद्रा आपल्या ईव्ही कॉन्सेप्टला बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजनच्या (born vision) नावाने साद करु शकते. महिंद्राच्या ईव्ही कॉन्सेप्ट युकेमध्ये असलेल्या महिंद्रा ॲडव्हांन्स डिझाईन युरोप स्टूडियोमध्ये तयार होणार आहे.

1) बॉर्न इलेक्ट्रिकच्या नावाने येईल ई-कार

महिंद्रा ऑटोने ट्‌वीट केले आहेत, की ‘बॉर्न इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या दुनियेत आपले स्वागत आहे. आमच्या जागतिक डिझाईनर्स आणि तज्ज्ञांच्या टीमने आपल्यासाठी इलेक्ट्रिक सहभाग आणि एक चांगली गुणवत्ता आणली आहे’. या ट्वीटमध्ये कंपनीने एक टीझर देखील समोर आणला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन प्लेटफॉर्म बनविला आहे. इलेक्ट्रिक कारच्या डिझाईनच्या मागे प्रताप बोस असून त्यांनी टाटाच्या न्यू जनरेशन मॉडेलचा लूक डिझाईन केला आहे.

2) XUV300 चा इलेक्ट्रिक व्हर्जन पुढील वर्षी

काही दिवसांपूर्वी महिंद्राने भारतात आपल्या ईव्ही प्लॅनला समोर ठेवून काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. कंपनीने सांगितले होते, की पुढील वर्षी XUV300 चे संपूर्ण इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणणार आहे. तर आता त्याच पार्श्वभूमीवर टीझरमध्ये तीन एसयुव्ही कार दिसून येत आहेत. अपकमिंग कारची जास्त माहिती उपलब्ध नाही. टीझरमध्ये केवळ हेडलाइट आणि टेललाइट लागलेला दिसून येत आहे. असे असले तरी, अपकमिंग इलेक्ट्रिक कारच्या डिझाईनचा काही प्रमाणात अंदाज यातून होउ शकतो. महिंद्राच्या ईव्ही मॉडेलचा लूक सध्याच्या ICE मॉडेलपेक्षा हटके वाटत आहे.

3) महिंद्राकडून 3000 कोटी रुपयांची गुंतवूणक

महिंद्राने इलेक्ट्रिक व्हीकल सेक्टरमध्ये एंट्री करुन तब्बल 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी पुढे आपल्या कमीत कमी चार एसयुव्ही मॉडेल्सला इलेक्ट्रिक एसयुव्ही कारमध्ये बदलण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नियोजनानुसार, एक्सयुव्ही 300 पहिली एसयुव्ही असेल ज्यात, जिला इलेक्ट्रिक कारच्या रुपात सादर करण्यात येईल.

4) महिंद्रा स्कॉर्पियोचे नवीन मॉडेलदेखील होणार लांच

इलेक्ट्रिक कारच्या व्यतिरिक्त महिंद्रा स्कॉर्पियोचे नवीन मॉडेलदेखील लवकरच लाँच करण्यात येणार आहे. नवीन स्कॉर्पियो अत्यंत वेगळ्या डिझाईनमध्ये सादर करण्यात येणार आहे. अपकमिंग एसयुव्हीचे एक्सटीरियरपासून ते इंटीरियरपर्यंत सर्वकाही बदलेल दिसून येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.