Marathi News Automobile Maruti and toyota to launch new cars in 2022 hilux urban cruiser land cruiser brezza jimny
ऑफ रोड कार ते न्यू लँड क्रूझर, Maruti, Toyota यावर्षी एकापेक्षा एक गाड्या लाँच करणार
भारतातील मारुती सुझुकीच्या गाड्यांची लोकप्रियता कोणापासूनही लपून राहिलेली नाही आणि टोयोटा ही मोठमोठ्या वाहनांसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. या वर्षी, हे दोन्ही ब्रँड त्यांच्या एकापेक्षा एक सरस कारचे अनावरण करू शकतात.
1 / 6
भारतातील मारुती सुझुकीच्या गाड्यांची लोकप्रियता कोणापासूनही लपून राहिलेली नाही आणि टोयोटा ही मोठमोठ्या वाहनांसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. या वर्षी, हे दोन्ही ब्रँड त्यांच्या एकापेक्षा एक सरस कारचे अनावरण करू शकतात, ज्याची माहिती आम्हाला गाडीवाडी नावाच्या वेबसाइटवरून मिळाली आहे. चला तर मग या गाड्यांबद्दल जाणून घेऊया.
2 / 6
टोयोटा हीलक्स (Toyota Hilux) या वर्षी 23 जानेवारी 2022 रोजी भारतात लाँच केली जाईल. यामध्ये इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरच्या IMV 2 प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. या गाडीची संभाव्य किंमत 28 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असेल. ही कार 2.8-लीटर टर्बो डिझेल इंजिनद्वारे सुसज्ज असेल जी 204 PS पॉवर आणि 500 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. (फाइल फोटो)
3 / 6
मारुती सुझुकी ब्रेझाचे नवीन मॉडेल या वर्षाच्या मध्यात सादर केले जाणार आहे. त्यात अनेक कॉस्मेटिक बदल केले जाऊ शकतात, जेणेकरून ती अधिक प्रीमियम कारमध्ये बदलता येईल. यामध्ये वायरलेस चार्जिंग, सनरूफ, कनेक्टेड टेक इत्यादी फीचर्स मिळतील. तसेच यामध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. (फोटो: मारुती वेबसाइट, प्रातिनिधिक फोटो)
4 / 6
टोयोटा अर्बन क्रूझर हे मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचे रिबॅज केलेले व्हर्जन आहे. ही नेक्स्ट जनरेशन अर्बन क्रूझर असू शकते. तथापि, त्यात काही बदल देखील केले जातील जेणेकरुन ही कार जुन्या मॉडेलपेक्षा बरीच वेगळी दिसेल. (फोटो: toyotabharat.com/)
5 / 6
या वर्षाच्या मध्यापर्यंत टोयोटा लँड क्रूझर जागतिक बाजारपेठेत दाखल होऊ शकते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यावेळी या कारमध्ये अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. यावेळी ट्विन टर्बो 3.4 लीटर V6 इंजिन उपलब्ध असेल. (फोटोः cardekho)
6 / 6
मारुती सुझुकी जिमनी ही लाइफ स्टाईल ऑफ-रोडिंग एसयूव्ही कार आहे. ही कार थ्री डोर मॉडेल म्हणून भारतात सादर केली जाऊ शकते. यात 1.5 लीटर पॉट K15B माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 105 PS पॉवर आणि 135 Nm टॉर्क निर्माण करू शकते. (फोटोः cardekho)