Maruti Electric SUV : मारुति इलेक्ट्रिक एसयुव्हीचा पहिला फोटो आला समोर, कधी लाँच होणार? जाणून घ्या
मारुति सुझुकीच्या इलेक्ट्रिक एसयुव्हीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर गाडीचा पहिला फोटो समोर आला आहे. चला जाणून घेऊयात इतर बाबी...
मुंबई : भविष्याचा दृष्टीकोनातून ऑटो कंपन्यांनी कात टाकण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळवला आहे. टाटा आणि महिंद्रा कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यात आता मारुती सुझुकी ही कंपनीही मागे राहिली नाही. कंपनी लवकरच आपलं इलेक्ट्रिक मॉडेल भारतात सादर करणार आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये इलेक्ट्रिक कारबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारप्रेमींना इलेक्ट्रिक कार चालवण्याची संधी लवकरच मिळणार आहे. मारुती इलेक्ट्रिक कारचा पहिला फोटो समोर आला आहे. तुम्हाला या कारमध्ये काय फीचर्स मिळणार आणि कधी लाँच होणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स..
मारुती सुझुकी ईव्हीएक्स कंपनीचे फीचर्स
लीक झालेल्या फोटोनुसार, सुझुकी ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. फ्रंट फेशिया, स्कल्पटेड बोनट डिझाईन आणि थिक बॉडी मागच्या बाजूला आहे, सुझुकी ईव्हीएक्समध्ये एक लेयर्ड स्पॉईडर, रग्ड बम्पर आणि फुल विड्थ कनेक्टिंग एलईडी स्ट्रीपसह शार्प टेल लँप पाहायला मिळेल.
गाडीला अलॉय व्हील्स स्टँडर्ड सेट आहे. पण त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, सुझुकी ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये 60 किलोवॅट बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. ही बॅटरी 550 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. ही बॅटरी जवळपास 138-170 अश्वशक्ती जनरेट करू शकते. यात 2 डब्ल्यूडी आणि ऑल व्हील ड्राईव्ह दोन्ही ऑप्शन मिळतील.
लाँच डिटेल्स आणि किंमत
मारुती सुझुकी इलेक्ट्रिक एसयुव्ही भारतात कधी लाँच होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही गाडी कधी रस्त्यावर दिसेल याबाबत माहिती काढली जात आहे. तुम्हीही याबाबत सर्च करत असाल तर थांबा..ही गाडी 2024 साली बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने अद्याप या गाडीची किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कारप्रेमींना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
मारुती इलेक्ट्रिक एसयुव्हीची थेट स्पर्धा टाटा कर्व आणि ह्युंदाई क्रेटासारख्या गाड्यांशी असेल. एका रिपोर्टनुसार, कंपनी भविष्यात इलेक्ट्रिक कार आणि त्याच्या निर्मितीसाठी देशात 100 अब्ज रुपायांची गुंतवणूक करणार असल्याचं चर्चा आहे.