22 लाखांची ‘ही’ आलिशान कार आता घरी आणा फक्त 2 लाखांत , सरकार देतंय घसघशीत अनुदान
Grand Vitara Zeta Plus ही कार एक मजबूत हायब्रिड गाडी आहे. या कारच्या एकूण किंमतीबद्दल बोलयाचे झाले तर 22 लाख रूपयांची ही कार तुम्ही केवळ 2 लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता.

तुम्हालाही जर महागडी कार घेण्याचे शौक आहे पण तुमचे बजेट खूपच कमी असल्याने कार खरेदी करू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यूपीच्या मुरादाबादमध्ये फक्त 2 लाख रुपये जमा करून ग्रँड विटारा प्लस कार खरेदी करता येणार आहे. ज्याची किंमत 22 लाख रुपये आहे.
मात्र ही कार तुम्हाला फक्त 2 लाख रुपयांमध्ये EMI वर देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या कारवर तुम्हाला एक लाख रुपयांचे सरकारी सबसिडी देखील मिळणार आहे. तसेच ही कार मोटर, बॅटरी आणि पेट्रोल या तिन्हींवर चालते. दरम्यान सरकारने ही कार करमुक्त केल्याने याला खूप मागणी असून लोकांच्या खूप पसंतीस उतरत आहे.
फक्त २ लाखात २२ लाखांची गाडी खरेदी करा
नेक्सा एजन्सीचे रिलेशनशिप मॅनेजर मयंक बिश्नोई यांनी सांगितले की, ग्रँड विटारा ही झेटा प्लस कार आहे. हे एक मजबूत हायब्रिड कार आहे. जर तुम्ही एकूण किंमतीबद्दल सांगायचे झाले तर त्याची रोख किंमत 22 लाख रुपये इतकी आहे. ही कार खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्हाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे ही कार खरेदी करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करत आहे. यासोबतच येणारा काळ हा फक्त हायब्रीड कार आणि ईव्ही कारचा आहे. त्यामुळे सरकारही त्याला पाठिंबा देत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हाला आरटीओ शुल्क भरावे लागणार नाही. फक्त प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
शासनाकडून दिले जातेय सबसिडी
तुम्ही जेव्हा ही कंजारी खरेदी कराल तेव्हा तुम्हाला सरकारकडून यावर एक लाख रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. यासोबतच Grand Vitara Zeta Plus ही कार ३३ मायलेजसाठी पुरस्कारही मिळाला आहे. जर कोणाला ईएमआयवर(EMI) कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण तुम्ही ही कार केवळ दोन लाख रुपये जमा केल्यानंतर खरेदी करून घरी घेऊन जाऊन शकता. तसेच यावेळी नेक्सा एजन्सीचे रिलेशनशिप मॅनेजर मयंक बिश्नोई यांनी सांगितले की, 90% फायनान्सचं काम आमच्याकडून ग्राहकांसाठी केला जातो.