Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिझेल सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी मारुती सज्ज, BS-6 डिझेल Ertiga, Vitara Brezza लाँच होण्याची शक्यता

भारतातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India- MSI) पुढील वर्षी डिझेल सेगमेंटमध्ये उतरण्याची शक्यता आहे.

डिझेल सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी मारुती सज्ज, BS-6 डिझेल Ertiga, Vitara Brezza लाँच होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 10:04 PM

मुंबई : भारतातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India- MSI) पुढील वर्षी डिझेल सेगमेंटमध्ये (Diesel Segment) उतरण्याची शक्यता आहे. डिझेल सेगमेंटमधील वाहनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे उद्योग विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. विशेषत: एसयूव्ही आणि मल्टिपर्पज व्हेईकल (MPV) विभागांतील वाहनांना चांगली मागणी आहे, त्यामुळे मारुती पुन्हा डिझेल वाहन विभागात उतरण्याची योजना बनवण्याच्या तयारीत आहे. (Maruti ready to enter in Diesel Segment, BS-6 Diesel Ertiga, Vitara Brezza likely to be launched)

यावर्षी एप्रिलपासून बीएस-VI उत्सर्जनाबाबतचे कडक नियम लागू झाल्यानंतर वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या मारुतीने डिझेल मॉडेल्स बंद केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारुतीने त्यांचा मानेसर पॉवरट्रेन प्लांट अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून ते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा उत्सवांच्या हंगामात बीएस-VI डिझेल इंजिन (BS-VI diesel engines) व्हेईकल सादर करु शकतील.

सूत्रांनी पुष्टी केली आहे की, मारुती सुझुकी कंपनी मारुती सुझुकी अर्टिगा (Ertiga) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Vitara Brezza) मॉडेल्समध्ये बीएस-6 सुसंगत डिझेल पॉवरट्रेनद्वारे देशांतर्गत बाजारात पदार्पण करू शकते. तथापि, मारुतीने पुन्हा एकदा डिझेल सेगमेंटमध्ये उतरण्याचे कोणतेही खास कारण सांगितलेले नाही.

याबाबत मारुती सुझुकीशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी आणि कंपनीच्या वाटचालीविषयी आम्ही कोणतेही संकेत देऊ शकत नाही. दरम्यान, सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की. कंपनी आपल्या मानेसर प्रकल्पातील विद्यमान सेटअप अपडेट करण्याची तयारी करत आहे. पूर्वी कंपनीने त्याच प्लांटमध्ये विकसित केलेले 1,500 cc चे बीएस-6 उत्सर्जन मानक डिझेल इंजिन बाजारात आणले होते.

कंपनीने या पॉवरट्रेनचा वापर काही काळापर्यंत त्यांच्या मध्यम आकाराच्या सेडान सियाझ (Ciaz) आणि अर्टिगामध्ये (Ertiga) केला होता. नंतर त्यांनी डिझेल विभाग बंद केला. त्यावेळी कंपनीच्या इतर मॉडेलमध्ये उदा. विटारा ब्रेझा (Vitara Brezza), डिझायर (Dzire), स्विफ्ट (Swift), एस-क्रॉस (S-Cross) आणि बलेनो (Baleno) मध्ये फिअॅटचं 1,300 सीसीचं इंजिन देण्यात आलं होतं.

इतर बातम्या

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

कोरोना संकटकाळातही प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ

Duster आणि Triber सह ‘या’ गाड्यांवर रेनॉ कंपनीकडून 70 हजार रुपयांपर्यंतची सूट

(Maruti ready to enter in Diesel Segment, BS-6 Diesel Ertiga, Vitara Brezza likely to be launched)

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.