Maruti Suzuki Dzire च नाही तर या तीन सेडान कारना देखील मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग
मारुती सुझुकी डिझायर कारचे नवीन मॉडेल लॉंच झाले असून या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले आहे. 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही एकमेव कार नसून आणखी काही सेडान कारना हे सेफ्टी रेंटिंग मिळालेले आहे.चला तर पाहूयात त्या कार कोणत्या आहेत.
नवीन कार घेताना लोक आता किंमत आणि मायलेज शिवाय आता सेफ्टी फिचर्स देखील पहात आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आता नवीन कार 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येत आहेत. भारतीय रस्त्यांवर कारच्या अपघाताचे प्रमाण मोठे असल्याने कारच्या सेफ्टी बाबत लोक आता जागृत होत आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अनेक भारतीय कारनी 5 स्टार रेटींग मिळविली आहे. अलिकडेच मारुती सुझुकी डिझायरला देखील 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे.
भारतीय बाजारात 5 स्टार सेफ्टी रेटींग मिळविणारी नवीन मारुती सुझुकी डिझायर ही एकमेव कार नसून अनेक कारना सेफ्टी रेटिंग मिळालेले आहे. मारुती डिझायर सह त्या सेडान कारची नावे पाहूयात ज्या भारताच्या सर्वात सुरक्षित कारमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत.
मारुती सुझुकी डिझायर
मारुती सुझुकी डिझायरने अलिकडे भारतीय बाजारात प्रसिद्धी मिळविली आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट या कारला एडल्ट सेफ्टीत 34 पैकी 31.24 गुण मिळविले आहेत.तर चाईल्ड सेफ्टीत या कारला 42 पैकी 39.20 गुण मिळाले आहेत. ही मारुती सुझुकीची पहिली कार आहे जिला सर्वात जास्त सेफ्टी पॉइंट मिळाले आहेत. या कारची एक्स शोरुम किंमत 6.79 लाख ते 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.
स्कोडा स्लाव्हीया
स्कोडा स्लाव्हीया ही भारताच्या 5 स्टार सेफ्टी रेटींग कारपैकी एक आहे. या कारला चाईल्ड सेफ्टी 49 पैकी 42 गुण मिळाले आहे. तर एडल्ट सेफ्टीत 34 पैकी 29.71 गुण प्राप्त केले आहे. या कारला सहा एअर बॅग्स आहेत. एबीएस आणि ईबीडी सह टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसह अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे. या कारची एक्स – शोरुम किंमत 10.69-18.69 लाख रुपये आहे.
फॉक्स वॅगन व्हर्टस
फॉक्स वॅगन व्हर्टस ग्लोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिलेली भारताची पहिली कार आहे. या कारला एडल्ट सेफ्टीत 34 पैकी 29.71 गुण मिळाले आहे. तर चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 42 गुण मिळालेले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 11.56 पासून सुरु होत असून 19.41 लाख रुपयांपर्यंत आहे.
हुंडई वेरना
हुंडई वेरना भारताची सर्वात विक्री होणारी सेडान कारपैकी एक कार आहे.या कारला 5 स्टार सेफ्टींग मिळालेली आहे. या कारला एडल्ट सेफ्टीत 34 पैकी 28.18 गुण मिळाले आहे.तर चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 42 गुण मिळालेले आहे.कारला फ्रंट आणि साईड एअर बॅग आहेत. ESC आणि Isofix सिट्स माउंट्स सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. वेरेना ची एक्स-शोरूम किंमत 11-17.48 लाख रुपये आहे.