Maruti Suzuki Fronx CNG: मारुती सुझुकीने बाजारात आणली नवीन सीएनजी कार, किंमत आणि फिचर्स

| Updated on: Jul 12, 2023 | 8:02 PM

मारुती सुझुकीकडे सध्या CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. त्यांनी भारतीय बाजारपेठेत 1.4 दशलक्ष (14 लाख) पेक्षा जास्त S-CNG वाहने विकली आहेत.

Maruti Suzuki Fronx CNG: मारुती सुझुकीने बाजारात आणली नवीन सीएनजी कार, किंमत आणि फिचर्स
मारूती कार
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मारुती सुझुकीने नुकतीच सीएनजी पॉवरट्रेनसह Fronx SUV सादर केली आहे. सिग्मा आणि डेल्टा या दोन प्रकारांमध्ये या कारची विक्री केली जाईल. सिग्मा कारची किंमत 8.41 लाख रुपये तर डेल्टा खारची किंमत 9.27 लाख रुपये असणार आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. Frox CNG ही कार 28.51 kmpl चा मायलेज देईल, असा दावा मारुती सुझुकी कंपनीने केला आहे. Maruti Suzuki Fronx CNG नुकत्याच लाँच झालेल्या ह्युंदाई एक्स्टर सीएनजीशी स्पर्धा करेल.

इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स

फ्रँक्स सीएनजीची इंजिन पॉवर 1.2-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. हे 6,000 rpm वर 88.50 bhp चे कमाल पॉवर आउटपुट आणि 4,400 rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते. CNG वर चालू असताना, 6,000 rpm वर पॉवर आउटपुट 76 bhp पर्यंत कमी होतो आणि 4,300 rpm वर टॉर्क आउटपुट 98.5Nm पर्यंत कमी होतो. CNG पॉवरट्रेन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

केवळ पेट्रोल इंजिन मॉडेलसह, 1.2-लिटर इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स व्यतिरिक्त 5-स्पीड AMT चा पर्याय मिळतो. मारुती सुझुकीने फ्रॉक्ससाठी बलेनो आरएसकडून 1.0-लिटर बूस्टरजेट इंजिन घेतले आहे. हे 98 Bhp ची कमाल पॉवर आणि 148 Nm चे पीक टॉर्क आउटपुट तयार करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

हे सुद्धा वाचा

मारुती सुझुकीकडे सध्या CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. त्यांनी भारतीय बाजारपेठेत 1.4 दशलक्ष (14 लाख) पेक्षा जास्त S-CNG वाहने विकली आहेत. सध्या कंपनी 15 सीएनजी मॉडेल्स विकते. जेव्हा निर्मात्याने डिझेल इंजिनमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी सीएनजी पॉवरट्रेनसाठी जोर देण्यास सुरुवात केली.