Maruti Suzuki : या तारखेला लाॅन्च होणार मारुतीची नवीन एसयूव्ही, मारुती ठरणार का गेमचेंजर?

मारुती आपला एसयूव्ही पोर्टफोलिओ पुन्हा एकदा ऑटो मार्केटमध्ये 50 टक्के हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत कंपनीची नवीन एसयूव्ही लाइन-अप आणखी मजबूत करेल. यामध्ये कंपनीच्या Brezza आणि Grand Vitara यांचाही समावेश आहे.

Maruti Suzuki : या तारखेला लाॅन्च होणार मारुतीची नवीन एसयूव्ही, मारुती ठरणार का गेमचेंजर?
मारूती सुझूकीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:43 PM

मुंबई : मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Fronx) लॉन्च होण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरच मारुती आपली आगामी कार भारतात लॉन्च करणार आहे. अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीची नवीन सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट यांना टक्कर देईल.  मारुती सुझुकी फ्रॉन्क्स  24 एप्रिलला म्हणजेच उद्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. Fronx ची विक्री मारुतीच्या Nexa डीलरशिपद्वारे केली जाईल ज्यात इग्निस, बलेनो, सियाझ, XL6 आणि ग्रँड विटारा देखील आहेत.

मारुती आपला एसयूव्ही पोर्टफोलिओ पुन्हा एकदा ऑटो मार्केटमध्ये 50 टक्के हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत फ्रँक्स कंपनीची एसयूव्ही लाइन-अप आणखी मजबूत करेल. यामध्ये कंपनीच्या Brezza आणि Grand Vitara यांचाही समावेश आहे.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स: वैशिष्ट्ये आणि किंमत

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स या गाडीला LED DRLs सह LED मल्टी-रिफ्लेक्टर हेडलॅम्प, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, LED रीअर कॉम्बिनेशन लॅम्प, शार्क फिन अँटेना आणि 16-इंच अलॉय व्हील यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. यात 9-इंच HD Smart Play Pro + इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अॅपल कार प्ले आणि अॅनराॅइड कनेक्टिव्हिटी, सराउंड साउंड सिस्टम, स्वयंचलित हवामान नियंत्रण, हेड-अप टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि वायरलेस चार्जर मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

भारतातील मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची एक्स-शोरूम किंमत 6.75 लाख ते 11 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. एसयूव्ही हार्टेक्ट प्लॅटफॉर्म वापरते आणि 6 एअरबॅग्ज, तीन-पॉइंट ईएलआर सीटबेल्टसह येईल. हिल- होल्ड असिस्ट आणि रोलओव्हर मिटिगेशनसह ESP, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS आणि Isofix चाइल्ड सीट माउंट यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची क्षमता

1.0-लिटर टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन, 100.06PS कमाल पॉवर आणि 147.6Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि ते 5-स्पीड एमटी किंवा 6-स्पीड एटीशी जोडले जाऊ शकते. 1.2-लिटर ड्युअल-जेट ड्युअल-VVT पेट्रोल इंजिनचा पर्याय असेल, जो 89.73PS ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो आणि 5-स्पीड MT किंवा 5-स्पीड AMT सह एकत्रित केला जाऊ शकतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.