Maruti Suzuki Cars : लाखो लोकांना हव्या आहेत मारुतीच्या ‘या’ दोन गाड्या, रोज होतंय ‘इतकं’ बुकिंग

तीन आठवड्यांमध्ये ग्रँड व्हिटारा गाडीच्या बुकिंगचा आकडा 20 हजारापार पोचला आहे. नवी एसयूव्ही असलेल्या या ग्रँड व्हिटाराचे बुकिंग 11 हजार रुपयांत करता येत आहे.

Maruti Suzuki Cars : लाखो लोकांना हव्या आहेत मारुतीच्या 'या' दोन गाड्या, रोज होतंय 'इतकं' बुकिंग
मारुती ब्रिझाImage Credit source: Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:47 PM

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) नुकतीच ग्रँड व्हिटारा (Grand Vitara) ही गाडी बाजारात सादर केली आहे. तर त्याआधी काही दिवस न्यू ब्रेझा (New Brezza) ही गाडी लाँच करण्यात आली होती. या दोन्ही गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. ग्राहकांना या दोन्ही SUV गाड्या खूप आवडल्या आहेत. ग्रँड व्हिटारा आणि न्यू ब्रेझा या दोन्ही एसयूव्हींचे (Suv car) आत्तापर्यंत एक लाखांहून अधिक बुकिंग झाले आहे. मारुती सुझुकीने या दोन्ही गाड्यांच्या बळावर भारतीय बाजारात या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ग्राहकांनाही या दोनही गाड्या खूप आवडल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Siddharth Antre ( Auto With Sid ) (@siddharthantre9)

एक लाखाचा आकडा पार

आत्तापर्यंत ग्रँड व्हिटारा गाडीची 26 हजारांपेक्षा जास्त युनिट्स बूक झाली आहेत. तर 75 हजारांपेक्षा अधिक लोकांनी न्यू ब्रेझा ही गाडी बूक केली आहे. दोन्ही गाड्या मिळून मारूती कंपनीला आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे. अजूनही दररोज दोन्ही गाड्यांसाठी जोरदार बुकिंग सुरूच आहे. 21 जून पासून न्यू ब्रेझा या गाडीचे तर 11 जुलै पासून ग्रँड व्हिटारा गाडीचे बुकिंग सुरू झाले होते.

11 हजार रुपयांमध्ये बुकिंग

अवघ्या तीन आठवड्यांमध्ये ग्रँड व्हिटारा गाडीच्या बुकिंगचा आकडा 20 हजारांपार पोचला आहे. ही नवी एसयूव्ही 11 हजार रुपयांमध्ये बूक करता येऊ शकते. या गाडीची किंमत अंदाजे 9.5 लाख रुपये ( एक्स- शो रूम) आहे. त्यामध्ये कंपनी व्हेंटिलेटेड सीट, मल्टीपल ड्रायव्हिंग मोड असे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्रँड व्हिटारा मिड साईज एसयूव्ही (SUV)ही मारुती सुझुकीची अशी पहिली कार आहे, ज्यामध्ये हायब्रिड इंजिन आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकापी शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड व्हिटाराच्या मजबूत हायब्रिड इंजिन व्हेरिएंटबद्दल लोकांच्या मनात रस दिसून येत आहे. ग्रँड व्हिटाराच्या बुकिंगपैकी निम्मे प्री-बुकिंग हे हायब्रिड व्हेरिएंट (कारचे) झाले आहे.

न्यू ब्रेझाच्या 4500 युनिट्सचे पहिल्या दिवशी बुकिंग –

मारुती न्यू ब्रेझा या गाडीला लाँचच्या दिवशीच चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी या गाडीची 4500 युनिट्स बूक झाली होती. दिवसेंदिवस या गाडीच्या बुकिंगचा आकडाही वाढत चालला आहे. न्यू ब्रेझाचे बुकिंग 21 जूनला सुरू करण्यात आले होते, तर 30 जूनला ही गाडी बाजारात सादर करण्यात आली. 11 हजार रुपये देऊन ही गाडी बूक करता येते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.