Maruti Suzuki: 15 पेक्षा जास्त सेफ्टी फिचरसह येते ही कार, किंमतही अगदी बजेटमध्ये

तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित कार खरेदी करायची असेल, तर मारूतीची ही गाडी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Maruti Suzuki: 15 पेक्षा जास्त सेफ्टी फिचरसह येते ही कार, किंमतही अगदी बजेटमध्ये
मारूती Alto K 10Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 1:56 PM

मुंबई, गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या, मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10) मध्ये इंजिन, देखावा, आराम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. सुरक्षेचे कठोर नियम लागू केल्यामुळे, कार निर्मात्यांना अगदी लहान आणि परवडणाऱ्या कारसाठीही मूलभूत सुरक्षा प्रदान करावी लागेल. नवीन मारुती सुझुकीने Alto K10 मध्ये मोठे बदल करून हे सिद्ध केले आहे. तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित कार खरेदी करायची असेल, तर Alto K10 हा एक चांगला पर्याय असू शकतो.

किंमत किती आहे?

हे सुद्धा वाचा

3.99 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या, नवीन Alto K10 ने जुन्या मॉडेलच्या तुलनेत बरेच नवीन बदल केले आहेत. जुन्या पिढीच्या 800 cc अल्टोपेक्षा ही अधिक सुरक्षित कार आहे. नवीन युगातील Alto K10 मध्ये 15 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कारमध्ये आहेत अनेक सेफ्टी फीचर्स

अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन प्लॅटफॉर्मने Alto K10 ला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवले आहे. ही आतापर्यंतची सर्वात सुरक्षित अल्टो आहे. Maruti Suzuki च्या मते, 2022 Alto K10 सर्व भारतीय सुरक्षा नियमांची पूर्तता करते, याचा अर्थ लवकरच ती NCAP सुरक्षा स्कोअर मिळवू शकते. नवीन मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये सापडलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, प्री-टेन्शनर्ससह सीटबेल्ट, हाय-स्पीड वॉर्निंग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Alto K10 पूर्णपणे नवीन चेसिसवर तयार करण्यात आली आहे

नवीन प्लॅटफॉर्म ज्यावर कार तयार केली गेली आहे त्यामुळे नवीन Alto K10 जुन्या मॉडेलपेक्षा मोठी झाली आहे. नवीन अल्टोची लांबी 3,530 मिमी, रुंदी 1,490 मिमी आणि उंची 1,520 मिमी आहे. कार आउटगोइंग मॉडेलपेक्षा लांब आणि रुंद आहे, याचा अर्थ आता तिच्या आत जास्त जागा मिळते. नवीन Alto K10 डिझाइन करताना मारुती सुझुकीने ग्राहकांच्या मागणीकडे विशेष लक्ष दिले आहे.

नवीन Alto K10 चे मायलेज

2022 Alto K10 मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे नवीन इंजिन. याला आता 1.0-लिटर 3-सिलेंडर के-सिरीज इंजिन मिळते, जे 65 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटीशी जोडलेले आहे, ज्याला मारुती सुझुकी AGS म्हणतात. नवीन इंजिन 24.9 kmpl चे मायलेज देते, जे रेनॉल्ट क्विड 1.0-लिटर प्रकाराच्या तुलनेत या विभागात सर्वाधिक आहे. याशिवाय, Alto K10 CNG सुमारे 33 किमी प्रति किलो मायलेज देते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.