मुंबई : गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मारुतीची निर्मिती आणि विक्री प्रभावित झाली आहे. जानेवारीत कंपनीचे उत्पादन 10 टक्क्यांनी घसरले आहे, त्यामुळे कंपनीची चिंता वाढली आहे. (Maruti suzuki production decreases by 10 percent in January 2021)
मारुती सुझुकीने 2021 मध्ये एकूण 1,60,975 वाहने तयार केली. तर, जानेवारी 2020 मध्ये मारुतीने एकूण 1,79,103 वाहनांची निर्मिती केली होती. जानेवारी 2020 च्या तुलनेत कंपनीच्या उत्पादनात जानेवारी 2021 मध्ये 10 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
जानेवारी 2021 मध्ये मारुतीने एकूण 1,56,439 प्रवासी वाहनांची निर्मिती केली. तर, जानेवारी 2020 मध्ये मारुतीने 1,76,598 प्रवासी वाहने तयार केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पादनात यंदा जानेवारी महिन्यात 11.4 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
मारुती सुझुकीच्या अल्टो (Alto) आणि एस-प्रेसो (S-Presso) यांसारख्या मिनी कारचे उत्पादन 19.3 टक्क्यांनी कमी झाले आहे. जानेवारी 2021 मध्ये या कारच्या 27,665 युनिट्सची निर्मिती झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 34,288 युनिट्सची निर्मिती करण्यात आली होती.
कंपनीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्येही घट झाली आहे. कंपनीच्या Dzire, Swift, Ignis, Baleno, WagonR, आणि Celerio यांसारख्या मोटारींचे उत्पादन 19.2 टक्क्यांनी घसरले. जानेवारी 2020 मध्ये या कारच्या 1,06,803 युनिट्सचे उत्पादन झाले होते तर जानेवारी 2021 मध्ये या कारच्या 86,282 युनिट्सचे उत्पादन झाले आहे.
यासह जानेवारी 2021 मध्ये Eeco व्हॅनचे उत्पादन वर्षाकाठी 19.6 टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी 2021 मध्ये, मारुतीने 11,769 इको व्हॅन तयार केल्या. तर जानेवारी 2020 मध्ये 14,639 वाहनांची निर्मिती झाली होती.
एका बाजूला मारुती सुझुकीच्या एंट्री लेव्हल आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये घट दिसून आली. त्याच वेळी, सेडान सेगमेंटमध्ये 89 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये Ciaz च्या 806 मोटारींचे उत्पादन झाले होते तर जानेवारी 2021 मध्ये कंपनीने Ciaz च्या 1,524 युनिट्सची निर्मिती केली आहे. या व्यतिरिक्त, युटिलिटी विभागातील जिप्सी (Gypsy), विटारा ब्रेझा (Vitara Brezza), अर्टिगा (Ertiga), एक्सएल 6 (XL6 ) आणि एस-क्रॉस (S-Cross) सारख्या वाहनांच्या उत्पादनात वर्षाकाठी 45.5% वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने या वाहनांच्या 29,199 युनिट्सची निर्मिती केली आहे. तर, जानेवारी 2020 मध्ये 20,062 युनिट्सची निर्मिती करण्यात आली होती.
हेही वाचा
Honda ची आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स
ट्रायम्फ टायगर 850 स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किती आहे किंमत
(Maruti suzuki production decreases by 10 percent in January 2021)