मारुती एस-प्रेसोची किंमत 3.71 लाखांपासून ते 5.8 लाख रुपयांपर्यंत आहे. ही छोटी एसयूव्ही Standard, LXI, VXI आणि VXI+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत. या कारच्या केवळ टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग मिळते. तर इतर व्हेरिएंट्समध्ये दुसरी एअरबॅग ऑप्शनल आहे.