मुंबई | 29 जुलै 2023 : आपल्या देशात मध्यमवर्गीयांच्या हातात पैसे आल्याने तसेच कर्ज पटकन मिळत असल्याने आता स्वत:ची चारचाकी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण पाच लाखाच्या आतील कार खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू 1 एप्रिलपासून काही गाड्यांचे प्रोडक्शन बंद झाल्याने स्वस्तातील गाड्याची सख्या कमी झाली आहे. ऑल्टो 800, रेनो क्वीड 800 cc इंजिन वेरीएंटचा समावेश आहे. तरीही बाजारात काही स्वस्तातील कार आहेत. जर तुम्हाला तुमची कार खरेदी करायची असेल तर आणि तुमचे बजेट जर 5 लाखापर्यंत आहे तर या गाड्यांची यादी पाहून घ्या..
1. मारूती सुझुकी अल्टो K10 : मारूती सुझुकीने ऑल्टो 800 चे प्रोडक्शन बंद केले आहे. ऑल्टो 800 भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. यात 1.0-लीटर तीन- सिलेंडर पेट्रॉल इंजिन आहे. किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरु होऊन 5.95 लाखापर्यंत जाते. ऑल्टो K 10 च्या फिचर्समध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto, किलेस एण्ट्री आणि डीजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. सेडान मॉडेलमध्ये स्टीअरिंग-माऊंटेड कंट्रोल आणि मॅन्यूअल रुपातील एडजस्टेबल ओआव्हीएमचा समावेश आहे.
2. मारूती सुझुकी एस-प्रेसो : आपल्याला पाच लाखापर्यंतच्या बजेटमधील दुसरा पर्याय आहे मारुती सुझुकी एस-प्रेसो हीचा आहे. या कारची किंमत 4.25 लाख रुपयांपासून ( एक्स-शोरुम ) सुरु होत आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिवीटी, एक डीजिटल स्पीडोमीटर आणि टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे अनेक फिचर्स आहेत. सुरक्षेसाठी तेथे ड्युअल फ्रंट एअरब्रेग, रियर पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट, ईबीडीसह एबीएस आणि फ्रंट सीटबेल्ट रिमायंडर अशी सुविधा आहे.
3. रेनॉल्ट क्विड : पाच लाखांच्या आत कारमध्ये रेनॉल्ट क्विड देखील एक चांगला पर्याय आहे. ज्यात 1.0 लीटरचे तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनने 68 PS आणि 91Nm ची शक्ती तयार होते. क्वीडची किंमत 4.70 लाख रुपयांपासून ते 6.33 लाख रुपयांपर्यंत आहे. रेनॉल्टने अलिकडेच रेनॉल्ट क्वीडचे 800cc इंजिन व्हेरीएंटला बंद केले आहे.