मुंबई : मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री साधली आहे. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2020 मधील 6,972 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वॅगन आरच्या विक्रीत मारुती सुझुकीने 179 टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे वॅगन आरने देशातील स्विफ्ट हॅचबॅक कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे. (Maruti Suzuki Wagon R becomes best selling car in june 2021, Swift slipped to second)
गेल्या महिन्यात मारुतीने स्विफ्टच्या 17,727 वाहनांची विक्री केली आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत स्विफ्टने दुसरं स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2021 मध्ये सीएनजी सेगमेंटमधील विक्रीतही वॅगन आर अग्रेसर राहिली आहे. गेल्या काही वर्षांत, वॅगन आरने उत्तम सीएनजी पर्याय म्हणून ग्राहकांची पसंती मिळवली आहे. देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने वॅगन आरच्या सीएनजी व्हेरिएंटची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती. जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, ह्युंदायच्या क्रेटा एसयूव्ही आणि Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक कारने या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ह्युंदाय ही मारुतीनंतरची दुसरी सर्वात यशस्वी वाहन कंपनी ठरली आहे.
ह्युंदायची क्रेटा ही कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे आणि मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये क्रेटा एसयूव्ही पहिल्या स्थानी आहे. जून 2021 मध्ये कंपनीने या कारच्या 9,941 युनिट्सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी हीच आकडेवारी 7,207 युनिट्स इतकी होती.
Tata Motors लवकरच Altroz आणि Nexon चं डार्क एडिशन लाँच करणार, नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास?#TataMotors #TataAltroz #TataNexon #DarkEditionhttps://t.co/mc1vJxjpMD
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2021
इतर बातम्या
लाट असो की लॉकडाऊन, महिंद्रा सुसाट, एका महिन्यात विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री
खूशखबर ! आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे नवीन नियम
जर्मन कारमेकर Volkswagen ची Polo GTI Facelift सादर, जाणून घ्या खास फीचर्स
(Maruti Suzuki Wagon R becomes best selling car in june 2021, Swift slipped to second)